मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांतील विजेत्या शाळांना निधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांतील विजेत्या शाळांना निधी
मुंबईतील सहा शाळांनी मिळवले होते राज्यस्तरावरील पारितोषिक
मुंबई, ता. १४ : शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनमध्ये मुंबईतील सहा शाळांनी राज्यस्तरावरील पारितोषिक मिळवले होते. तर दक्षिण आणि उत्तर विभागातील ११ शाळांनी उत्कृष्ट शाळा म्हणून सन्मान मिळवला होता. त्या शाळांना बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या निधीचे वितरण सम्रग शिक्षा अभियानाच्या माध्यमातून करण्यासाठी नुकतीच कार्यवाही करण्यात आली.
यात पश्चिम विभागातील ११ शाळांना मिळून २६ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यामध्ये पाच लाखांचे बक्षीस एका शाळेला, तीन लाखांचे बक्षीस चार शाळांना, दोन लाखांचे बक्षीस तीन शाळांना, तर एक लाखाचे बक्षीस तीन शाळांना मिळाले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या निधीतून शाळा, विद्यार्थ्यांच्या विकासासंदर्भात अनेक उपक्रम राबविण्यासाठी शाळांना मदत मिळत असते.
राज्यात १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले होते. त्यात मुंबईतील जिल्हा स्तरावर सहा आणि विभागातील ११ शाळांची निवड झाली होती. यात पुरस्कारप्राप्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासावर भर देण्यात आला होता. तसेच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण क्रीडा आदींसोबत शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी अभियान महत्त्वाचे ठरले होते.
मुंबई पब्लिक स्कूल कुलाबा इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांनी वीजबचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपकरणांचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी मूल्यांची जडणघडण व्हावी, यासाठी विशेष लक्ष देत त्यासाठीचे उपक्रम राबवले होते. तसेच शाळेत परसबागेचा विकास, उर्वरित अन्नाची विल्हेवाट लावणे, मूल्यसंस्कार, वृक्षसंवर्धन, विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सवयी, सुरक्षा आदींवरही भर दिला होता.
--
या आधारे मूल्यमापन
अभियानात शाळांचे मूल्यमापन पायाभूत सुविधा, शासन धोरणांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आकलन तसेच पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, राष्ट्रप्रेम, विजेची बचत, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, विविध कौशल्य आणि संविधान मूल्य या मुद्द्यांच्या आधारे करण्यात आले. मूल्यांकनासाठी एकूण १५० गुण ठेवण्यात आले होते. मुंबईत महापालिकेच्या २,३७३ आणि उपविभागीय शिक्षण संचालकांच्या अंतर्गत १,७४२ शाळा आहेत. यात मुंबईतील सहा शाळांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.