आत्मनिर्भर भारत कोणापुढे झुकणार नाही
आत्मनिर्भर भारत कोणापुढे झुकणार नाही
एकनाथ शिंदेंचे स्वातंत्र्यदिनी ठाण्यात प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या बाबतीत देशाची पावले वेगाने पडत आहेत. अशातच अमेरिकेने आयात शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला कोणताही नेता रोखू शकणार नाही. आत्मनिर्भर भारत हा कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही, महाराष्ट्रही झुकणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आदी उपस्थित होते.
‘देश बदलतोय, विकासाचे वारे वाहू लागले आहेत. १० वर्षांपूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या दहांतही नव्हती. ती आज पहिल्या पाच देशांत मोजली जाते आणि लवकरच ती जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल. भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली आहे. आज आपला भारत देश महासत्तांच्या डोळ्याला डोळे भिडवून स्वाभिमानानं उभा आहे! देशाची प्रगती अनेकांना बघवत नाही. त्यामुळे आपले शत्रूसुद्धा वाढलेत. पण हम भी किसीसे कम नहीं हे आपण दाखवून दिले आहे. आमच्या आयाबहिणींचे कुंकू पुसण्याचे धाडस करणाऱ्या पाकिस्तानचे कंबरडे ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने मोडले. सहा पाकिस्तानची विमाने सुदर्शन प्रणालीने काही मिनिटांत पाडली. पुन्हा नांगी वर काढता येणार नाही, अशी पाकिस्तानची नांगी ठेचली आहे. देशाच्या सरहद्दीवर आपल्या फौजा डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहेत. मी त्यांनाही वंदन करतो, सॅल्यूट करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर झालेल्या विकासयात्रेत महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येतेय. ठाण्यासारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या जिल्ह्याचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्या सात-आठ वर्षांत ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणले आहे. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तीन हजार कोटींचा निधी ठाण्यातल्या विकासकामांना दिल्याने विकासाला गती आली आहे. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक प्रकल्प आहेत. त्यातले अडथळे दूर करून या कामाला गती देतो आहोत, असे शिंदे म्हणाले.
...
मोदींकडून ऊर्जा मिळते!
‘ठाण्याचा प्रत्येक क्षेत्रात राज्यातच नाही तर देशात प्रथम क्रमांक पाहिजे. आज यासाठी जी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते, ती आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळत असते, असेही ते म्हणाले.
...
तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांची तक्रार व अडीअडचणी तत्काळ सोडविण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ९९३०००११८५ हा तो व्हॉट्सॲप क्रमांक असून, नागरिकांना या क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे. प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ‘एक मेसेज व्हॉट्सॲपचा तुमच्या समाधानाचा’ या उपक्रमाचा प्रभावीपणे वापर करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.