मालमत्ता धारकांना मिळणार ओळखपत्र

मालमत्ता धारकांना मिळणार ओळखपत्र

Published on

नवी मुंबईतील मालमत्ताधारकांना ओळखपत्र
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेबाबतची माहिती देणारे मालमत्ता ओळखपत्र उपलब्ध करून देण्यास स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरुवात झाली. मालमत्ताधारकांना मालमत्ता ओळखपत्र उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. या मालमत्ता ओळखपत्राचा लाभ शहरातील ३.५ लाख मालमत्ताधारकांना होणार असून त्यांना आपल्या मालमत्तेबाबतची मालमत्ता क्रमांक, पत्ता, क्षेत्रफळ, कर तपशील अशी सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी या पॅन कार्डसारख्या कार्डद्वारे उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पाच मालमत्ताधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता ओळखपत्रे वितरित करण्यात आली. या कार्ड स्वरूपातील ओळखपत्राद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्ता कराची थकबाकी, आगाऊ भरलेली कराची रक्कम सहजपणे पाहता येणार आहे. ओळखपत्र घेऊन मालमत्ताधारक थेट नागरी सुविधा केंद्रावर जाऊन कर भरू शकतात. या मालमत्ता ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच आधार कार्डप्रमाणे हे मालमत्तेचे अधिकृत ओळखपत्र म्हणूनही वापरता येईल. या मालमत्ता ओळखपत्रामुळे मालमत्तेची विक्री, हस्तांतरण इत्यादींसाठी मालमत्तेची ओळख व पडताळणी सोपी होईल, तसेच यामुळे मालमत्ताधारकांना मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधताना होणाऱ्या श्रम, वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
...
मालमत्ता ओळखपत्राचा उपक्रम मालमत्ता कर विभागातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविणारा आहे. नागरिकांना मालमत्ता ओळखपत्र उपलब्ध करून देणारी देशातील पहिली महानगरपालिका असा लाभणारा नावलौकिक नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com