पालिका निवडणूकीआधी बेस्टमध्ये शिवसेना - मनसे युतीचा प्रयोग
बेस्टमध्ये शिवसेना-मनसे युतीचा प्रयोग
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एकदिलाने प्रचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे. बेस्ट कामगारांच्या या पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीला निर्विवाद विजय मिळवून द्यायचा, अशा निर्धाराने दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीला आता राजकीय रंग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर पालिका निवडणुकीच्या आधी बेस्टमध्ये होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही पक्ष युती म्हणून लढत आहेत.
बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित ‘उत्कर्ष पॅनेल’चा गुरुवारी (ता. १४) परळ येथील शिरोडकर हायस्कूलच्या सभागृहात मेळावा झाला. या मेळाव्याला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी, कार्याध्यक्ष ॲड. उदय आंबोणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बेस्ट कामगारांच्या पतपेढीतील शिवसेना-मनसे युतीचा विजय हा संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील विजयाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीत सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंना बळ द्यावे आणि निवडणूक जिंकून द्यावी, असे आवाहन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी निवडणुकीत ‘ठाकरे बॅण्ड’चेच वर्चस्व राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सहकार समृद्धी पॅनेलही रिंगणात
श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक यनियन, एससीएसटी वेल्फेअर असोशिएशन, बहुजन एम्प्लॉईज युनियन या संघटनांचे सहकार समृद्धी पॅनेल रिगणात असून, आमचे पॅनेल जिंकणार असल्याचा विश्वास दि इलेस्ट्रिक युनियनचे सरचिटणीस संजय घाडीगावकर यांनी व्यक्त केला आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.