आम्हाला भाकरीपेक्षा स्वातंत्र्य अधिक प्रिय
आम्हाला भाकरीपेक्षा स्वातंत्र्य अधिक प्रिय!
‘श्रमजीवीं’ची तिरंग्याला मानवंदना
वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे स्वातंत्र्यदिनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उत्सव साजरा झाला. स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित राहिलेल्या आदिवासी, कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत आपल्या राष्ट्रध्वजाला, तिरंग्याला अभिमानाने मानवंदना दिली. गेल्या साडेतीन दशकांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहाने आणि जोशाने साजरी झाली. ‘आम्हाला भाकरीपेक्षा स्वातंत्र्य अधिक प्रिय आहे,’ असे उद्गार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी या वेळी काढले.
‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले आणि ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे या सोहळ्यात प्रमुख उपस्थित होते. देशभरातील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवामध्ये हा एकमेव कार्यक्रम आहे, जिथे २५ ते ३० हजार आदिवासी स्वयंस्फूर्तीने, स्वतःच्या खर्चाने, नाचत-गात, देशभक्तीच्या भावनेने झेंडावंदनासाठी एकत्र येतात. भरपावसात एकाही सभासदाने भिजण्याची तमा न बाळगता पूर्ण पायी मिरवणूक आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून तिरंग्याला मानवंदना दिली. यंदा वज्रेश्वरीपासून गणेशपुरीपर्यंत तब्बल तीन तास चाललेल्या भव्य रॅलीने या उत्सवाला एक वेगळीच रंगत आली. १० वर्षांच्या बाल कार्यकर्त्यांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील आदिवासी बांधवांनी या रॅलीत सहभाग घेतला. पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमधून सुमारे २५ ते ३० हजार सभासद या अनोख्या उत्सवात सामील झाले. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना सलामी देत या उपेक्षित कष्टकऱ्यांनी आपली देशभक्ती आणि एकजुटीचे दर्शन घडवले.
...
स्वातंत्र्याचा खरा अर्थ
या सोहळ्यात विवेकभाऊ पंडित यांनी आपल्या भाषणात आदिवासी आणि कष्टकरी समाजाच्या संघर्षाला वाचा फोडली. ‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा सामाजिक आणि आर्थिक समतेचा आहे. आजही ज्यांच्या झोपडीत स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचला नाही, ज्यांना पोटभर अन्न आणि पुरेसा रोजगार मिळत नाही त्यांच्यासाठी आपली लढाई सुरूच राहील,’ असे ते म्हणाले. त्यांच्या कन्या आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही आपल्या प्रभावी भाषणात उपस्थितांना प्रेरणा देत आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी एकजुटीचे आवाहन केले. हा उत्सव फक्त झेंडावंदनाचा नाही, तर आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि देशभक्तीचा उत्सव आहे, असे त्यांनी सांगितले.
...
एक प्रेरणादायी उत्सव
श्रमजीवी संघटनेने गेल्या ३५ वर्षांत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अनेक लढे उभारले आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिन उत्सवातही त्यांनी सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. हा उत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून, आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि देशप्रेमाचा एक प्रेरणादायी उत्सव आहे, असे या वेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.