दूरस्थ शिक्षणातून ‘मानसशास्त्र’ बंद

दूरस्थ शिक्षणातून ‘मानसशास्त्र’ बंद

Published on

दूरस्थ शिक्षणातून ‘मानसशास्त्र’ बंद
विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश
मुंबई, ता. १६ : देशभरातील दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने लाखो तरुणांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना यापुढे मानसशास्त्र हा विषय शिकवता येणार नाही. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा अभ्यासक्रम दूरस्थ आणि ऑनलाइन मोड पद्धतीने शिकवण्यासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित संस्थांनीही जुलै-ऑगस्ट २०२५पासून मानसशास्त्र या अभ्यासक्रमाचे प्रवेश करून घेऊ नयेत, असे आदेश यूजीसीने दिले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आडून देशभरात दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थांवर दिवसेंदिवस विविध प्रकारचे नियम लादले जात असल्याने या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यापूर्वी दहावी नापास असलेल्या विद्यार्थ्यांनाही काही परीक्षा देऊन पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत होती. ती संधी बंद करण्यात आली. दुसरीकडे अशाच काही जाचक नियमांमुळे मुंबई विद्यापीठातील ‘आयडॉल’सारख्या संस्थांमध्ये प्रवेशाची संख्या झपाट्याने घटली असून, अशीच परिस्थिती पुणे, कोल्हापूर, नागपूर इत्यादी विद्यापीठांतील दूरस्थ पद्धतीने सुरू असलेल्या शिक्षणाची आहे. आता यात यूजीसीने मानसशास्त्र या विषयावर बंदी आण‍ल्याने या विषयातील विद्यार्थी दूरस्थ शिक्षणापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अन्य विषयांवरही बंदी
मानसशास्त्र विषयावरील बंदीसाठी यूजीसीने राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग कायदा, २०२१मधील काही तरतुदींचा तसेच त्यातील विषयांचा आधार घेतला आहे. यासाठी आयोगासोबत झालेल्या बैठकीत आरोग्यसेवा आणि संबंधित विषयांच्या विशेषज्ञतेमध्ये दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीच्या अभ्यासक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मानसशास्त्र विषयासोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न आणि पोषण विज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स हे विषय दूरस्थ आणि ऑनलाइन मोडमध्ये शिकवले जाऊ नयेत, अशी शिफारस आयोगाने केली होती, असे सांगत यूजीसीने मानसशास्त्र विषयावर बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com