पनवेलमध्ये शास्ती माफीला मुदतवाढ
पनवेलमध्ये शास्ती माफीला मुदतवाढ
आतापर्यंत २१२ कोटी ५७ लाखांची विक्रमी वसुली
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार या योजनेत शास्ती माफीसाठी दिलेली मुदत आता वाढविण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत शास्तीवरती ९० टक्के सूट राहणार आहे. तसेच १६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत कर भरल्यास ७५ टक्के शास्ती माफी मिळणार आहे.
२०२५-२६ या चालू आर्थिक वर्षासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपूर्ण कर भरल्यास ५ टक्के सवलतही दिली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने करदात्यांना ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पद्धतीने कर भरणे यासाठी प्रोत्साहित केले जात असून, असे केल्यास अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो. तसेच ऊर्जा बचत, जल पुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये सहभाग घेणाऱ्या करदात्यांनादेखील दोन टक्के सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित कर तत्काळ भरावा, असे आवाहन आयुक्त उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे. नागरिकांचा अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आता १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत शास्तीवरती ९० टक्के सूट राहणार आहे. अभय योजनेमध्ये १८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आतापर्यंत एकूण २१२ कोटी ५७ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.