यह फेविकाॅल का जोड है : राजन विचारे
यह फेविकाॅल का जोड है : राजन विचारे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. ‘यह फेविकाॅल का जोड है, टुटेगा नही...’, त्यामुळे राज्यात चांगले घडणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
माजी खासदार राजन विचारे यांनी भगवती मैदानात सुरू असलेल्या मनसेच्या दहीहंडी उत्सवाला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी जनतेच्या मनात जे आहे, ते साध्य होणार आहे. सर्वांचे स्वप्न आहे, की राज्यात मराठी माणसाचा आवाज घुमला पाहिजे, त्याची सुरुवात आता झाली आहे. मुंबई, ठाणे आणि इतर पालिकांवर भगवा झेंडा फडकेल. विरोधकांनी धसका घेतला आहे. ठाकरे हे ठाकरेच आहेत. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्या वेळी त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष काढला. दुसऱ्याचा पक्ष फोडायला गेले नव्हते. ते समर्थपणे पक्षाची धुरा घेऊन राज्याच्या हितासाठी काम करीत आहे. पक्षात गद्दारी झाल्यानंतरही उद्धव ठाकरे हे चांगल्या पद्धतीने संघटन कौशल्य वापरून काम करीत असल्याचेदेखील विचारे यांनी या वेळी सांगितले. हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर काय घडले हे संपूर्ण राज्याने पाहिले. शेवटी सरकारला ही सक्ती मागे घ्यावी लागली. अध्यादेश रद्द करावा लागला, हीच खरी राज्याची ओळख आहे.
कल्याण सुभाष भोईर, राजू पाटील यांचे एकत्रित फोटो
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सूतोवाच खासदार संजय राऊत यांनी केले. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा उत्साह दहीहंडी उत्सवातदेखील दिसून आला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे एकत्रित फोटो बॅनरवर झळकवत, गोविंदा मंडळाने कल्याण लोकसभा आणि कल्याण ग्रामीण विकासाचा नवा अध्याय असा संदेश दिला आहे. यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवलीत चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.