सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे जल्लोष
सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे जल्लोष
मुंबई, ता. १६ : राज्यभरात दहीहंडी सणाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. पारंपरिक जल्लोषासोबतच अनेक ठिकाणी सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी विविध दहीहंडी मंडळांना भेट देऊन चाहत्यांचे मनोरंजन केले. काहींनी आगामी चित्रपट वा मालिकेचा प्रचार साधला, तर काहींनी मित्रत्वाच्या नात्यामुळे हजेरी लावली.
दादरमधील आयडियल दहीहंडी सोहळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पार पडला. या वेळी ‘दशावतार’ चित्रपटातील कलाकार अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनी उपस्थित राहून उत्सवात रंग भरले. विशेष म्हणजे दहीहंडी फोडण्याचा मान अभिनेता सिद्धार्थ मेननला मिळाला. घाटकोपर येथे राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि अभिनेत्री जया प्रदा यांनी हजेरी लावली. अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपट ‘परम सुंदरी’च्या प्रमोशनसाठी दिसली. मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील, जान्हवी किल्लेकर आणि संजू राठोड यांनी उपस्थित राहून चाहत्यांची मने जिंकली. मुंबईतील विविध ठिकाणी सेलिब्रिटींच्या सहभागामुळे दहीहंडीला अधिकच सोनेरी सजावट लाभली असून, सामाजिक संदेश आणि मनोरंजनाचा संगम साधत उत्सवाला वेगळेच रूप मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.