मुसळधार पावसाने खड्डे अधिकच खोल
चाकरमान्यांच्या प्रवासात खड्डेच खड्डे
खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च वाया; सततच्या पावसाने खड्ड्यांचे प्रमाण वाढले
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना यंदा तरी चाकरमान्यांना खड्डेविरहीत प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न होते. नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या आदेशानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले; परंतु हे सर्व प्रयत्न मुसळधार पावसाने वाया गेले. बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. पुढील आठ दिवसांत हे खड्डे दिवसरात्र करून बुजवावे लागणार आहेत; मात्र पावसाने साथ न दिल्यास यंदाही तळकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.
मागील १४ वर्षे रखडलेले काम एका वर्षात पूर्ण करण्याची नवीन मुदत बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात महामार्गावर पडलेले खोल खड्डे मुसळधार पावसात भरणार का, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास कायम असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नागोठणे ते कोलाड यादरम्यान मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरणाचे काम शिल्लक आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका मोकळी करून देण्यात येणार होती. यासाठी या लेनवरील खड्डे आठ दिवसांपूर्वीच भरण्यास सुरुवात झाली होती; परंतु पडणाऱ्या पावसाने ते पुन्हा वाढू लागले आहेत.
एक फूट खड्डे
गणपती आले आणि मंत्री जागे झाले, अशी टीका होऊ लागली आहे. दरम्यान, सरकारच्या या ढिसाळ कारभाराने चाकरमान्यांच्या नशिबी तोच रस्ता, तेच खड्डे, तेच जीवघेणे अपघात अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे. काही ठिकाणी साइडपट्टीच नसल्याचे दिसून येत आहे.
देखरेखीसाठी राज्यस्तरीय समिती
महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सध्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात महामार्गावर पडलेले खोल खड्डे मुसळधार पावसात भरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चाकरमान्यांचे हाल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो चाकरमानी कोकणात परतणार आहेत; मात्र त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणेच रस्ता आणि खड्डे हे जीवघेणे संकट ठरत आहेत. काही खड्डे तब्बल एक फूट खोल असून, त्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांसाठी धोका अधिक वाढला आहे. साइडपट्ट्या नसल्याने वाहनचालकांवर धोका अधिकच वाढतो आहे. नागोठणे ते कोलाडदरम्यान अजूनही काँक्रीटीकरणाचे मोठे काम शिल्लक आहे. एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार होती; परंतु पावसामुळे त्या लेनवरील खड्डे अधिकच वाढले आहेत.
गणपती आले की मंत्री होतात जागे
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘गणपती आले की मंत्री जागे होतात’ अशी टीका समाजमाध्यमांवरून होत आहे. शासनाच्या हलगर्जीमुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा त्रासदायक प्रवासाला सामोरे जावे लागणार आहे.
एका वर्षात १४ वर्षांचे काम पूर्ण करायचे लक्ष्य
महामार्गाचे रखडलेले काम एका वर्षात पूर्ण करण्याची डेडलाइन ठरवण्यात आली असून, कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समितीस कामे मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात
मुसळधार पावसामुळे बांधकामांची वाट लागली
नागोठणे ते कोलाडदरम्यान रस्ता अजूनही अर्धवट
राज्यस्तरीय समितीने कामांचा घेतला आढावा
प्रवाशांना त्रास; अपघाताची शक्यता वाढली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.