पावसामुळे अलिबाग - वडखळ वाहतूक खोळंबली
अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक ठप्प
खड्डे, पर्यटकांच्या गर्दीमुळे कोंडी
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : अलिबाग- वडखळ राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक पूर्णतः विस्कळित झाली आहे. त्यातच सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, या मार्गावर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
शुक्रवारी (ता. १५) सकाळपासूनच मुंबईहून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या अचानक वाढली. या वाहतुकीवर पावसाचा जोर आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे अजूनच परिणाम झाला. वडखळ ते धरमतर, शहाबाज ते पेझारी आणि तिनविरा ते कार्लेखिंड या मुख्य ठिकाणी वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. केवळ २८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल पावणेदोन तास लागले. वाहतूक कोंडीत बेशिस्त वाहनचालकही मोठे कारण ठरत आहेत. लेनची शिस्त न पाळल्यामुळे आणि समोर जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाने घुसखोरी केल्यामुळे कोंडी आणखी गंभीर झाली.
सततच्या पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढली असून, काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताचेही प्रसंग घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनचालक व प्रवाशांना रस्त्यात तासनतास अडकून रहावे लागले असून, त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.