‘सुर्यघर’ योजनेत महाराष्ट्र अव्वल

‘सुर्यघर’ योजनेत महाराष्ट्र अव्वल

Published on

‘सूर्यघर’ योजनेत महाराष्ट्र अव्वल
घरगुती ग्राहकांनी ओलांडला एक हजार मेगावॉट वीजनिर्मितीचा टप्पा


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने आघाडी घेतली आहे. गेल्या दीड वर्षात घरगुती वीजग्राहकांकडे या योजनेंतर्गत तब्बल एक हजार मेगावाॅट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जानिर्मिती युनिट बसविण्यात आले आहे. अवघ्या दीड वर्षात महावितरणने हा टप्पा गाठला आहे. त्यामुळे महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये जाहीर केलेल्या या योजनेचा घरगुती ग्राहकांना थेट लाभ मिळत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना महावितरणला दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दीड वर्षात छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या राज्यातील ग्राहकांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक झाली आहे, तर त्यांनी बसवलेल्या सूर्यघर युनिटची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता १,००० मेगावाॅट एवढी झाली आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांना केंद्र सरकारकडून १,८७० कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत नागपूर विभागाने आघाडी घेतली असून, तेथे तब्बल ४० हजार १५२ लाभार्थी ग्राहक आहेत, तर त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १५७ मेगावॉट एवढी आहे.

विभाग लाभार्थी वीजनिर्मिती क्षमता
- पुणे - १९ हजार १९५ लाभार्थी, ८९ मेगावॉट क्षमता
- जळगाव - १८ हजार ८९२ ग्राहक, ७० मेगावॉट क्षमता
- अमरावती - १५ हजार २४५ ग्राहक, ६३ मेगावॉट क्षमता
- छत्रपती संभाजीनगर १६ हजार ६६४ ग्राहक, ५९ मेगावॉट क्षमता
- नाशिक - १५ हजार ४६८ ग्राहक, ५५ मेगावॉट क्षमता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com