ठाणेनगरीत जखमी गोविंदांचा आकडा पोहोचला २७ वर
ठाणेनगरीत जखमी गोविंदांचा आकडा पोहोचला २७ वर
जखमींमध्ये स्थानिक अधिक; एकाला हलवले मुंबईला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ ः दहीकाला उत्सवाची पंढरी असलेल्या ठाणेनगरीत मानवी मनोऱ्याचे विश्वविक्रम नोंदवला गेला. याचदरम्यान जखमी गोविंदांचा आकडाही २७ वर पोहोचला आहे. यामध्ये दोन मुंबई, एक नवी मुंबई आणि उर्वरित गोविंदा हे स्थानिक (कळवा, मानपाडा आणि वागळे) आहेत. त्यातील एकमेव गोविंदाला उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आले आहे. उर्वरित गोविंदांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २२ तर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदाचा जखमी गोविंदांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजप्रमाणे मुसळधार नाही; पण शनिवारी (ता. १६) ठाणे शहरात पावसानेही सकाळपासून संततधार अशीच हजेरी लावली होती. त्यातच मोठ्या रकमांची हंडी असल्याने ठाणे, मुंबई आणि इतर आजूबाजूच्या शहरातून विविध गोविंदा पथके ठाणेनगरीत दाखल होऊन मानवी मनोरे उभारण्याची कसरत करत होते. ही कसरत करताना कोणाच्या डोक्याला, खांद्याला, छातीला, कंबरेला, पाठीला तर कोणाच्या हाताला, पायाला आणि नाकाला दुखापत झाली असून एका गोविंदाच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यांना ठामपा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ आणून त्यांच्या उपचार करून घरी सोडण्यात आले. एका जखमीला मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चौकट
ठामपा रुग्णालयातील जखमींची नावे
आदित्य रघुनाथ वर्मा (१८), कृष्णा मिठू स्वयन (१३), समर बन्सीलाल राजभर (१०), चंदन जैस्वाल (२३), अक्षय शर्मा (२६), सर्वेश चव्हाण (२७), शंकर पाटील (२७), साहिल भोईर (१९), अनुप यादव (३५), विशाल भोईर (३२), कुणाल भुवने (२३), सागर इंगळे (२४), संतोष गावडे (३०), विशाल कदम (२८), प्रमोद चव्हाण (२७), अविश्वर साळुंखे (३२), रुपेश शिंदे (२४) हे ठाण्यातील जखमी गोविंदा आहेत. तसेच मुंबईच्या भांडुप येथील निशांत संतोष सावंत (५) आणि सौरभ प्रकाश जाधव (२६) अशी जखमी गोविंदांची नावे आहेत. तसेच अजय परशुराम नरगडे (१५) असे एकमेव जखमी नवी मुंबईतील गोविंदाचे नाव आहे.
चौकट
जिल्हा शासकीय रुग्णालयातील जखमींची नावे
रोहन पागे (२४), कल्पेश पाटील (१७), श्रीराज पवार (१०), करण पवार (१७), सिद्धू सुहास मुंडा (११) असे ठाण्यातील जखमी गोविंदांची नावे आहेत.
कोट
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला होता. शनिवारी दिवसभरात पाच जखमी गोविंदा दाखल झाले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
रात्री उशिरापर्यंत २२ जखमी गोविंदांना उपचारासाठी ठामपा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामधील एका गोविंदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुंबईला हलविण्यात आले आहे. उर्वरित गोविंदांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दहीकाला उत्सव लक्षात घेऊन विशेष कक्ष रुग्णालयात तयार केला होता.
- डॉ. अनिरुद्ध मालगावकर, वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.