रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

Published on

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : मुसळधार पाऊस पडणाऱ्या जव्हार तालुक्यात रस्त्यांची दैना होणे अगदी नित्याचे आहे. रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दर्जा हा विषय खूप खोलातला आहे, परंतु टीका-टिपण्णी करण्यापेक्षा यंदाच्या पावसात वाहून गेलेला पिंपळशेत, चांभारशेत, आकरा, तिलोंडा ग्रामपंचायतीला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने १२ हजार नागरिकांची वस्ती असलेल्या या भागात दळणवळणाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. येथील ५० युवक-युवतींकडून श्रमदानाने दोन दिवस दगड, माती भरत रस्त्याची दुरुस्ती केली. त्यामुळे नागरिकांसह चालकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीपैकी माडविहरा येथील गणपत भेस्कर यांच्या पुढाकाराने तरुणाई एकत्र आली. शिंगारपाडा , माडविहरा, हुंबरण ते किन्हवलीला जाणाऱ्या रस्त्याची मागील वर्षी मुसळधार पावसामुळे दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे येथील युवकांनी सलग दोन दिवस ऐच्छिक श्रमदान करून ३०० मीटर लांबीचा रस्ता दुरुस्ती केली.

विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी हा रस्ता अशाच प्रकारे वाहून जातो. त्याकरिता मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ही बाब निदर्शनास आणूनदेखील दुरुस्ती करण्यात येत नाही. या भागात फक्त लोकप्रतिनिधी मते मागण्यासाठी येतात, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक देत आहेत.

हा रस्ता सिल्व्हासाला महानगराला जोडणारा असल्याने येथील नागरिकांना काही कामांसाठी जव्हार शहरात दाखल होताना दूर अंतर पडते. हे लक्षात घेत हा रस्ता युवकांनी दुरुस्त केले. हुंबरणचे शिक्षक, सिल्व्हासा खानवेलला कंपनीत जाणारे तरुणांना सोईस्कर झाले आहे. याकरिता योगेश भेस्कर, अरूण खुताडे, रूतिक खुताडे, प्रभू गिंभल, विनय भेस्कर, महिंदा रावते, रणजित माळकरी, यशुनाथ गिंभल, सूरज माळकरी, करशन माळकरी, हर्षद फरारा, रघुनाथ खुताडे, हर्षद गांगडा यांनी मेहनत घेतली.

सिल्व्हासाला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे पिंपळशेत, खरोंडा, आकरे, चांभारशेत या ठिकाणचे युवक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. हा रस्ता डांबरीकरण व्हावा, यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
- एकनाथ दरोडा, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com