ज्वारी उकडी पान मोदकाची बाजी

ज्वारी उकडी पान मोदकाची बाजी

Published on

विरार, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सव जवळ येऊ लागला असून, आता घराघरात मोदक बनविण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर्षी गणपतीला कोणते मोदक बनवायचे, यावर मते घेतली जात असतानाच यंग स्टार ट्रस्टतर्फे रविवारी (ता. १७) आयोजित मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत आशा म्हात्रे यांनी सादर केलेले ज्वारी उकडीचे पान मोदक सर्वोत्तम ठरत पहिले स्थान पटकावले.

मोदक स्पर्धेत अननसाचे मोदक, ओली हळदी, शेंगदाणा, पंचरूची मोदक शतावरी, नागवेल पान, बीटरूट, दुधी, बेलाचे पान ड्रॅगन फ्रूट, ज्वारी उकडी पान मोदक, असे अनेक पौष्टिक प्रकार मोदक स्पर्धेत बघायला मिळाले. दुधी, ओरिओ, शुगर फ्री मोदकांनी लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत अपर्णा कडू यांच्या वनरंग मोदकांनी द्वितीय क्रमांक, चैताली पाटील या शतावरी मोदक (तृतीय), प्रीती पालकर यांच्या ड्रॅगन फ्रूट-सीताफळ मोदक आणि लक्ष्मी लेंगरे यांच्या पंचरूची मोदकाला उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. विवा काॅलेजमधील नम्रता खारकंडी, सिद्धेश वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जुने विवा काॅलेजमध्ये उखाणे स्पर्धा आयोजित केली होती. राजकीय, सामाजिक पारंपरिक यापैकी कोणतेही दोन उखाणे घ्यायचे होते. ‘बाहेर वातावरणात वाढलाय उष्मा, घरी मागवला गारेगार फंटा, अन्.... माझी प्रीती झिंटा’ असे विविध उखाणे घेत महिलांनी आनंद लुटला. ज्युनियर कॉलेजच्या स्मिता सावे यांनी परीक्षण केले. अनुष्का घाडीगावकर यांना प्रथम, द्वितीय स्थानी हर्षा नाईक, तर मालती भटवलकर तृतीय आणि उत्तेजनार्थ ममता बाणे, उत्तेजनार्थ अंजली कदम यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बक्षीस वितरणावेळी ज्येष्ठ समाजसेवक किरण ठाकूर, नगरसेविका रिटा सरवैया, ॲड. नयन जैन, राजेश बक्षी, मुग्धा लेले, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, मिलिंद पोंक्षे, भूषण चुरी यांनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com