सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
पाण्यातून मार्गक्रमणाचे वाहनचालकांसमोर आव्हान
एमआयडीसी परिसरासह शहरातील सखल भागात पाणी
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : मुसळधार पावसाने नवी मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे एमआयडीसी परिसरासह शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती, तर पावसामुळे विद्यार्थ्यांबरोबर प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले.
नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जुईनगर येथील रेल्वे ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत सायन-पनवेल महामार्गावर जावे लागत होते. पहाटेपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने मॅफको मार्केटचा रस्त्यापासून एपीएमसी मार्केटचा पूर्ण परिसर जलमय झाला. पाणी साचल्याने अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
--------------------
सायन-पनवेल महामार्गावर कोंडी
सायन-पनवेल महामार्गावर सकाळी टेम्पो बंद पडल्याने वाहतूक कोंडीचा फटका सायन-पनवेल महामार्गाला बसला. सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांचे तसेच कामावर निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात असल्याने मुख्य प्रवेशद्वार परिसरात पाणी साचले होते. रस्त्याला नद्यांचे स्वरूप आल्याने पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांचीही गैरसोय झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.