धुव्वाधर पावसातही मेट्रो सुसाट!

धुव्वाधर पावसातही मेट्रो सुसाट!

Published on

पावसात मेट्रोचा मुंबईकरांना आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सकाळपासून धुव्वाधार बरसणा-या पावसामुळे ठिकाठिकाणी पाणी भरल्याने रस्ते वाहतूकीसह लोकल सेवेलाही फटका बसलेला असताना, उन्नत आणि भुयारी मेट्रो सेवा मात्र भर पावसातही सुसाट होती. एमएमआरडीए, एमएमआरसीएल आणि मेट्रो-१ कडून चालवल्या मेट्रोवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि दुपारनंतर घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांनी आज मेट्रोचा आधार घेतला.
मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आज तिसऱ्या दिवशीही कायम होती; मात्र दोन दिवसात बेताचा पाऊस झाल्याने आणि आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने मुंबईकरांनी सकाळीच कार्यालय गाठले होते. तसेच विद्यार्थ्यींनीही शाळा गाठली होती; मात्र सकाळी १० नंतर पावसाचा जोर वाढल्याने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकाठिकाणी पाणी भरल्याने रस्ते वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. तसेच लोकल सेवाही कासवगतीने सुरू होती. त्यामुळे अंधेरी-दहिसर-गुंदवली, अंधेरी-घाटकोपर आणि वरळी-आरे या भुयारी मेट्रो मार्गाने घर गाठले. त्यामुळे दुपारनंतर सदरच्या तिन्ही मेट्रो मार्गावर प्रवाशांची गर्दी होती.
---------
एमएमआरडीएकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था
पावसामुळे मेट्रो प्रवासाकडे मुंबईकरांची पावले वळल्याचे निदर्शनास येताच एमएमआरडीएने आपल्या मेट्रो-२अ आणि मेट्रो ७ या मार्गावर आपतकालीन परिस्थितीत अतिरिक्त फेऱ्या चालवता याव्यात म्हणून स्टॅण्डबाय मेट्रो ट्रेनची तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे पावसातही प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---
हेल्पलाईन
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कामावर जाताना किंवा परतताना प्रवाशांना मेट्रो सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही अणिबाणीच्या वेळी प्रवाशांकरिता एमएमआरडीएने १८०० ८८९ ०५०५ / १८०० ८८९ ०८०८ सुरू केली आहे.
-----------
मेट्रो प्रवाशांची संख्या
- अंधेरी-दहिसर-गुंदवली - १ लाख ३० हजार (दुपारी २ पर्यंत)
- अंधेरी-घाटकोपर - ५ लाख १० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com