पेणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा

पेणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा

Published on

पेणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा
हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठी गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पेण, ता. १९ (वार्ताहर) : कोकणासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पेण तालुक्यातही सततच्या पावसामुळे नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पावसामुळे हेटवणे धरण भरून वाहू लागल्याने सोमवारी सकाळी धरणाचे तब्बल सहा दरवाजे उघडण्यात आले. यामधून सुमारे ११९. ५४ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठी वसलेल्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील अनेक भागांत शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शहरातील खालच्या भागात पाणी साचून रस्त्यावर तळे झाल्याने वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. पेणजवळील भुंडा पूल पाण्याखाली गेला असून नदी-नाले तुडुंब भरले आहेत. हेटवणे धरण सध्या ९५ टक्क्यांहून अधिक भरले असून वाढत्या पाण्याचा ताण कमी करण्यासाठी सहा दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने खालच्या भागातील नागरिकांना घराबाहेर जाणे टाळण्याचे व सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर पाहता काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लवकर घरी पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com