मुंबई
भर पावसात अनियमित पाण्याचे संकट
वसई, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएच्या सूर्या योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन आणि सूर्यानगर जलशुद्धीकरण केंद्र या भागात, तसेच महापालिकेच्या सूर्या योजनेच्या जुन्या आणि नवीन योजनेच्या मासवन पंपिंग स्टेशन आणि धुकटन जलशुद्धीकरण केंद्र येथे मंगळवारी (ता. १९) जोरदार वारा, वादळ, अतिवृष्टी होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहरात तिन्ही योजनांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. दुपारी दोन वाजता तिन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे पाणीवितरण अनियमित होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.