बेस्ट बस वाहतुकीला फटका
बेस्ट बस वाहतुकीला फटका
अनेक मार्ग वळवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित झाले असून, बेस्ट बस वाहतूक सर्वाधिक प्रभावित झाली आहे. शहर व उपनगरांतील शेकडो बसमार्ग बंद करण्यात आले आहेत, तर अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. काही ठिकाणी बस अर्धवट धावू लागल्या आहेत.
किती मार्ग बंद?
आणिक डिपो परिसर, वडाळा विभाग, दादर, अंधेरी, मालाड, कुर्ला, धारावी, साकीनाका, मानखुर्द अशा भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तब्बल ३० हून अधिक बसमार्ग थेट बंद करावे लागले. यामध्ये दादर परिसरातील ए-४२, ५०५, ५०४, ३७२, सी-६० तसेच आझादनगर, शारदा सिनेमा, साईनाथ चौकी, अँटोप हिल, बोईसर–वडाळा चर्च मार्गावरील सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली.
किती मार्ग वळवले?
पाण्यामुळे ६० हून अधिक मार्ग वळवण्यात आले. यामध्ये आणिक डेपोमधील ३६०, ३५५, ३५७ मार्ग, वडाळा विभागातील ३६८, ४०, दादर-हिंदमाता परिसरातील अनेक मार्ग, मालाड सबवे, आरे कॉलनी, गोरगाव-अंधेरीतील २०२, २०३, २५६, ३६१ तसेच कुर्ला एल. बी. एस. रोडवरील ३२५ मार्गांचा समावेश आहे.
अर्धवट सेवा
मिरा रोड, काशीमिरा ब्रिज, नॅशनल पार्क व दहिसर परिसरातील काही बस फक्त अर्ध्या मार्गापर्यंतच धावल्या.
गंभीर परिस्थिती
हिंदमाता, दादर, मालाड, अंधेरी, कुर्ला, मिरा रोड आणि ठाणे या भागांत सकाळी सहा ते अकरादरम्यान पाणी साचल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सायंकाळी उशिरापर्यंत अशीच स्थिती होती. बेस्ट प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा, बससेवेबाबत माहिती घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.