बोरघाट अवजड वाहतुकीसाठी बंद
बोरघाट अवजड वाहतुकीसाठी बंद
खालापूर, ता. २० (बातमीदार) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात होणारे जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी अखेर अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे आदेश जारी केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि १०हून अधिक लोक जखमी झाले होते.
खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांनी या गंभीर समस्येची दखल घेत रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ हा तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांचा असल्याने येथे अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत. सचिन हिरे यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्याकडेही वाहतूक बंदीची मागणी केली होती. तसेच परिसरातील कारखानदारांशी बोलून अवजड वाहने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने वळवण्याचे प्रयत्नही सुरू केले होते.
पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या म्हणण्यानुसार, अपघात टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक होते. अनेक वाहनचालक टोल वाचवण्यासाठी हा धोकादायक मार्ग निवडत होते. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. या निर्णयामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.