गणरायासह गौराईंच्याही आकर्षक मूर्तींची, मुखवट्यांची भुरळ

गणरायासह गौराईंच्याही आकर्षक मूर्तींची, मुखवट्यांची भुरळ

Published on

सोनपावलांनी आली गौराई...
रायगडात पूजनाच्या विविध पद्धती, महिलावर्गांत उत्साह
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यासह कोकणात गौरी पूजनाच्या विविध पद्धती पाहायला मिळतात. यामध्ये काही ठिकाणी गौरीचे मुखवटे आणून त्यांना साडी, दागिन्यांनी सजविले जाते. तर काही ठिकाणी गौरीच्या मूर्तीची स्थापना करून तिची पूजा केली जाते.
कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुले आणली जातात. त्या फुलांची पूजा केली जाते. त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने मुखवटा घालतात. काही भागांत मूर्तींची पूजा होते. बऱ्याच ठिकाणी लाकडी गौरी असतात. त्यावर साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात. काही लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात. तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्यानंतर मूर्तीला साडी नेसवून दागिन्यांनी सजवतात.
-------------------------------
ओवशातून माहेरवाशिणींचे कौतुक
गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते. गौरी पूजनावेळी ओवसा भरण्याची एक प्रथा दिसून येते. माहेरवाशिणीच्या हातूनच गौराईची स्थापना केली जाते. ओवसा म्हणजे ओवसणे किंवा ओवाळणे. ही पद्धत पुरातन काळापासून आहे. पहिला ओवसा नववधूसाठी महत्त्वाचा असून माहेरी, सासरी गौराईसमोर सूप ओवसते. काहीजणींच्या घरी पाच तर काही ठिकाणी नववधू दहा सुपांचा ओवसा घेऊन येते. यातून माहेरवाशिणीचे कौतुक किंवा तिचा मानसन्मान करण्याची पद्धत आहे.
-----------------------
राज्यासह परराज्यात मागणी
पेण तालुक्यातील जोहे-हमरापूर, कळवे, दादर, तांबडशेत, अंतोरे दिव, उंबर्डे अशा गावांत शेकडो कारखाने निर्माण झाले आहेत. गौरीचे मुखवटे, पूर्ण आकारातील गौरीच्या मूर्ती साकारत आहेत. गणेशमूर्तीसारख्या गौरीच्या मूर्तींचीही सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि विविध प्रकारच्या गौरींचे मुखवटे साकारले जातात. सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती, विविध प्रकारांच्या मूर्तीमुळे गुजरात, पुणे, मुंबई, कोकणात जास्त मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com