मानसिक ताणातून बचावासाठी हेल्पलाईन, सर्वसामान्यांसाठी ही उपयुक्त

मानसिक ताणातून बचावासाठी हेल्पलाईन, सर्वसामान्यांसाठी ही उपयुक्त
Published on

आता डॉक्टरांसाठीही हेल्पलाइन
ताणतणाव दूर करण्यासाठी मिळणार मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : अलीकडे अभ्यास, कामाच्या ताणतणावातून मानसिक नैराश्य वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व आजारासह मानसिक आजारावर उपचार करणारे डॉक्टरही त्याला अपवाद नाहीत. वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टरांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
वैद्यकीय रुग्णालय तसेच महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर विविध प्रकारच्या तणावांचा सामना करतात. सरकारकडून त्यांना योग्यवेळी मदत मिळावी याचीही मागणी केली जाते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैयक्तिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातही त्यांना आव्हानांना तोंड द्यावे लागते. या नैराश्यातून मागील वर्षभरात राज्यात सात डॉक्टरांनी आत्महत्या केली, तर पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे यासंदर्भात मदत उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हेल्पलाइन सुरू करण्यात आली. यासाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील सदस्य डॉ. सजल बंसल यांच्यासह अध्यक्ष डॉ. मनीष जांगडा व अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांच्या संकल्पनेतून ही देशव्यापी हेल्पलाइन साकार झाली आहे.

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर, पदवीधर वैद्यकीय विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राध्यापक, वैद्यकीय संघटनांशी संबंधित डॉक्टर आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर यांना ही सुविधा देण्याचा प्रयत्न संघटना करत आहे. मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन देणाऱ्या डॉक्टरांचे मोबाईल क्रमांक संस्थेने जारी केले आहेत. डॉक्टरांव्यतिरिक्त जर कोणत्याही सामान्य व्यक्तीने या क्रमांकावर संपर्क साधला, तर त्यालाही मार्गदर्शन केले जाईल.
डॉ. अक्षय डोंगरदिवे, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन

.....................................
हेल्पलाइनचा उपयोग
या हेल्पलाइनसाठी देशभरातील ५० डॉक्टरांची टीम काम करत आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ, मल्याळी, बंगाली, अशा विविध भाषांचे समुपदेशक येथे उपलब्ध आहेत. कोणत्याही भाषेच्या अडचणीमुळे डॉक्टरांना त्यांच्या समस्या सांगितल्यानंतर समुपदेशनाची सुविधा मिळेल. सातही दिवस २० तास ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.
.....................................
केंद्र सरकारनेही काही वर्षांपूर्वी निवासी डॉक्टरांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन सुविधेची सुरुवात केली होती. त्यात प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पाच विद्यार्थी डॉक्टरांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी-डॉक्टर मनमोकळेपणाने बोलू शकतील, असा विश्वास होता; मात्र तसे होऊ शकले नाही. आता सुरू केलेली देशव्यापी हेल्पलाइन निश्चितपणे मदत करेल, असा विश्वास विद्यार्थी-डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com