शहाड–मुरबाड व कल्याण–कर्जत रस्त्यांची बिकट अवस्था
कल्याण - कर्जत रस्त्यांची बिकट अवस्था
‘पॅचवर्क’चा फसलेला खेळ
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरातून जाणारा शहाड - मुरबाड रस्ता आणि कल्याण - कर्जत महामार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहेत. जोरदार पावसामुळे नव्याने भरलेले खड्डे उखडले असून, वाहनचालक याने त्रस्त झाले आहेत. शहाड फ्लायओव्हर हा उल्हासनगर-कल्याण-मुरबाड जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पण येथे वारंवार भरलेले खड्डे पावसात टिकले नाही. पुलावर आणि मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यातून वाहतूक खोळंबा होत असून, रुग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवा अडथळ्यांत अडकल्या आहेत.
शहाड फाट्याजवळ पावसाचे पाणी तासन् तास साचून राहते. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. कल्याण-कर्जत महामार्ग हा हाउल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व वांगणी परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायिनी मार्ग आहे. मात्र प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे तयार होते. यंदाही अपवाद नाही. डांबराचा थर उखडून रस्ते धोकादायक बनले आहेत. दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले तरी टिकाऊ उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. या खड्ड्यांमुळे केवळ वाहतूकच नाही तर नागरिकांच्या जीवितहानीची शक्यता वाढल्याचे नागरिकांच्या वतीने सतत सांगितले जात आहे.
आरोग्यसेवा व दैनंदिन वाहतुकीवर परिणाम
उल्हासनगर-३ मधील सेंट्रल हॉस्पिटलसमोरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने रुग्ण, नातेवाईक व अॅम्ब्युलन्सला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील इतर शासकीय कार्यालयांकडे जाणारे रस्तेही अशाच अवस्थेत असून कोंडी होत आहे. खड्ड्यांमुळे दररोज नवे अपघात घडत असून, नुकतेच कल्याण-कर्जत रोडवर एका डॉक्टरचा अपघात झाला होता. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला असून, ‘खड्डे म्हणजे मृत्यूचे सापळे’ अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.