ठाण्यात दीड लाखांहून अधिक बाप्पा येणार मुक्कामी

ठाण्यात दीड लाखांहून अधिक बाप्पा येणार मुक्कामी

Published on

दीड लाखांहून अधिक बाप्पा मुक्कामी
ठाण्यात गणेशभक्तांची जोरदार तयारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : गणेशोत्सवानिमित्त ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या भागांत तब्बल एक लाख ५७ हजार ८४२ बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी २७ ऑगस्ट या बाप्पांच्या मुक्कामी आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली आहे. ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या शहर पोलिस आयुक्तालयातील पाचही परिमंडळ कार्यक्षेत्रांत एकूण दीड लाख बाप्पांचे आगमन होणार आहे. यामध्ये सार्वजनिक असो वा घरगुती आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांची धावपळ सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

त्यातच आता कोकणवासी गणेशोत्सवासाठी गावीकडे निघाले आहेत. त्यातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोकणवासीयांना सुखरूप गावी नेण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी लाल परीची मदत घेतल्याचे दिसत आहे. गणेशोत्सव आणि कोकणवासीयांचे एक अतूट नाते आहे. या उत्सवाला नकळत कोकणवासी हमखास कोकणात जाताच. ट्रेन, लाल परीला कितीही गर्दी असली तरी किंवा खड्डे असलेल्या त्या रस्त्यांवरून ते या उत्सवासाठी मोठ्या ध्येयाने प्रवास करतात. यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यातच खासगी गाड्या घेऊन जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागामार्फत टोल फ्री पासचे वाटप केले जात असल्याने कोकणवासी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दीड दिवसाचे बाप्पा
यंदा दीड दिवसाच्या ४३ हजार ६८४ इतक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. यामध्ये सहा सार्वजनिक बाप्पा असणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांत सर्वाधिक १३ हजार २१ दीड दिवसाच्या बाप्पांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ वागळे इस्टेट ११ हजार ७५६, उल्हासनगर ९ हजार ९८१, भिवंडी ४ हजार ७९१, ठाणे ४ हजार १३५ असे या शहरातील परिमंडळात बाप्पांचे आगमन होणार आहे.

१० दिवसांचे बाप्पा
दीड आणि सात दिवसांच्या बाप्पांप्रमाणे १० दिवसांच्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ४४ हजार ३२९ इतक्या बाप्पांमध्ये ७९४ सार्वजनिक आणि ४३ हजार ५३५ घरगुती बाप्पांचा समावेश आहे. तसेच २१ दिवसांचे ५२ घरगुती बाप्पांचे याचदरम्यान आगमन होणार आहे.

शहर पोलिस आयुक्तालयातील बाप्पा
परिमंडळ सार्वजनिक घरगुती
ठाणे शहर १२७ १५,४९६
भिवंडी १८३ १६,३२३
कल्याण २८९ ४५,११३
उल्हासनगर २६३ ४९,४६१
वागळे इस्टेट १९८ ३०,३८९
एकूण १,०६० १,५६,७८२


एकूण १,०६० १,५६,७८२
निष्कर्ष:

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणे विभागातील विविध भागांत लाखो भक्त बाप्प्यांना मुक्कामी आणण्यासाठी उत्सुक आहेत. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्प्यांची संख्या खूप जास्त असून, येत्या गणेशोत्सवाला या भागांत जोरदार उत्साहाने साजरा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com