घणसोलीत मेघ मल्हार परिसरात अतिक्रमण

घणसोलीत मेघ मल्हार परिसरात अतिक्रमण

Published on

घणसोलीत मेघ मल्हार परिसरात अतिक्रमण
नवी मुंबई, ता. २३ (बातमीदार) : मेघ मल्हार येथील परिसरात परवानगी न घेता रस्त्याच्या कडेला अनधिकृत स्टॉल उभारले जात असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, दररोज नवीन स्टॉल्स उभे केले जात आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता हे व्यवसाय सुरू असून, सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या कब्जा केला जात असल्याने सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. नगरसेवक व मनपा प्रशासनाला यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी कारवाई होत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून होत आहे आणि त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. “सार्वजनिक जागा व्यापून विक्री केल्याने आमचा प्रवास धोकादायक होतो. शाळकरी मुले, वृद्ध लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता या अतिक्रमणाविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com