खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

Published on

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत
पनवेल, खारघर, कळंबोली परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मनस्ताप
पनवेल, ता. २३ (बातमीदार)ः गणरायाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी पनवेलकरांची लगबग सुरू झाली आहे; मात्र संततदार पावसामुळे पालिका क्षेत्रामध्ये खड्डे पडलेले आहेत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक असून पालिका क्षेत्रातील सर्व खड्डे बुजवले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
पनवेल वसाहतीमधून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम चालू आहे. ज्या ठिकाणी जुने डांबरीकरण झालेले रस्ते आहेत. त्या सर्वच मार्गासह वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत सुरू आहे. पनवेल परिसरातून महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी वापरलेला निकृष्ट मुरूम, माती पावसामुळे रस्त्यावर आली आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यापेक्षा वसाहतअंतर्गत रस्त्याची स्थिती खराब आहे. पनवेल तक्का ते रेल्वेस्थानक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तसेच नवीन पनवेल डीमार्ट रोड, आदई सर्कल, आसूडगाव प्रवेशद्वार खड्ड्यांची चाळण झाले आहे.
---------------------------------------
पनवेल ः तक्का स्थानक रोड, नवीन पनवेल सेक्टर एक, खांदा कॉलनी सेक्टर आठ, आसुडगाव देशी तडका हॉटेल, खांदा कॉलनी ते खांदेश्वर स्थानक रोड व खांदेश्वर रेल्वेस्थानक ते कामोठा या मार्गावरील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.
-----------------------
खारघर ः शहरातील बेलपाडा गावाहून रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्गाची दुर्धर अवस्था झाली आहे. बेलपाडा गावाजवळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहने एखाद्या होडीप्रमाणे हेलखावे खात चालतात.
-------------------------
कळंबोलीत तलावमार्गाची दुरवस्था
कळंबोली-रोडपाली येथील गणेश विसर्जन तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे आहेत. कळंबोलीकडून विसर्जन तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर एका विकसकाने अर्धा रस्ता, पदपथ गिळंकृत केला आहे. तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर आल्याने या ठिकाणी गणेश विसर्जनाला अडथळा येणार आहे.
़़ः------------------------
पालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यासह वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रगतिपथावर चालू आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कुठल्याही प्रकारचे खड्ड्यांचे विघ्न येणार नाही.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com