रस्त्याच्या कडेला थांबून गर्भवतीची सुखरूप प्रसूती
भरपावसात रुग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती
बोईसर, ता. २३ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असताना आणि रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होत असताना एका गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच यशस्वी प्रसूती करण्यात आली. पालघर-मनोर रस्त्यावर ही घटना घडली असून, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आई आणि बाळ दोघांचाही जीव वाचला.
तामसई कासपाडा येथील रहिवासी असलेल्या सुमित्रा पाटील (वय २६) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे गुरुवारी (ता. २१) रात्री उशिरा १०८ रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने रुग्णालय गाठणे आव्हानात्मक होते. सुरुवातीला १०२ क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पावसाळेमुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर १०८ला कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत पोहोचली.
मासवण आरोग्य केंद्रातील आशाताईंनी मुसळधार पावसात मातेच्या घरी भेट दिली. १०२/१०८ला त्वरित संपर्क साधून त्वरित सेवेने मातेचा व बाळाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. आशाताई, डॉ. जानवी यादव आणि पूजा शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमने या परिस्थितीत केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान
सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रुक्साना शेख यांच्यासह रुग्णवाहिका पालघर-मनोर रस्त्यावरून जात असताना महिलेच्या वेदना तीव्र झाल्या. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास अधिक वेळ लागणार असल्याचे लक्षात घेऊन डॉ. शेख यांनी रुग्णवाहिकेचे चालक सचिन भोईर यांना गाडी रस्त्याच्या कडेला थांबवण्यास सांगितले. प्रसंगावधान राखत डॉ. शेख यांनी रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पहाटे २:३०च्या सुमारास सुमित्रा पाटील यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचे वजन २.७३० ग्रॅम असून, बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले. पुढील उपचारांसाठी त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.