संस्थांनी महापालिकेच्या शाळा नि:शुल्क स्वरूपात चालवाव्यात

संस्थांनी महापालिकेच्या शाळा नि:शुल्क स्वरूपात चालवाव्यात

Published on

संस्थांनी महापालिकेच्या शाळा नि:शुल्क स्वरूपात चालवाव्यात
मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. त्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याची व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे सांगितले.
या निर्णयानुसार सद्य:स्थितीत खासगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल तर त्याला विरोध का, असा प्रश्नही लोढा यांनी या वेळी उपस्थित केला.
मालाडमध्ये सरकारी जमिनींवर सर्वात जास्त अतिक्रमणे झाली. आता महापालिकेच्या शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होत आहे का? येथील आमदारांनी काय विकास केला ते त्यांनी सांगावे. मालवणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांगलादेशी कुठून आले, त्यांना इतके सहकार्य कोणी केले, त्यामागचा हेतू काय अशा प्रश्नांची फैरही लोढा यांनी झाडली. आज आम्ही मालवणीत विकासाचे काम करीत आहोत. मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा देत आहोत. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची मुले परदेशात शिकतात. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये, असेही लोढा यांनी सुनावले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत या शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती. या निधीतून विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, व्यायामशाळा, खेळांचे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासंदर्भातील पत्र लोढा यांनी आजच्या कार्यक्रमात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com