रायगड जिल्हयात गणेशोत्सवाचा उत्साह

रायगड जिल्हयात गणेशोत्सवाचा उत्साह

Published on

घरोघरी नवचैतन्याची लाट
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर)ः गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आल्याने नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. चाकरमानी गावाकडे निघाल्याने गावागावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरी, व्यवसायासाठी गेलेला कोकणवासी गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी येत असतो. गणेशोत्सवातील १० दिवस जिल्ह्यात धामधूम सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख दोन हजार ४८४ गणपतींची स्थापना होणार आहे. यामध्ये २८६ सार्वजनिक तर एक लाख दोन हजार १९८ खासगी गणपतींचे आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे १६ हजार १७५ गौराईंचे आगमन गणपती आगमनाच्या चौथ्या दिवशी होणार आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या असून, गणपतीसाठी सजावट तसेच पूजेचे साहित्य, विविध प्रकारची फळे, मिठाई, पर्यावरणपूरक आरास विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
-----------------------------------------
लाखाहून अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना
जिल्ह्यात २८६ सार्वजनिक तर एक लाख दोन हजार १९८ खासगी अशा एकूण एक लाख दोन हजार ४८४ गणपतींची स्थापना होणार आहे. त्याचप्रमाणे १६ हजार १७५ गौराईंचे आगमन गणपती आगमनाच्या चौथ्या दिवशी होणार आहे. उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी दोन हजार ८९५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
---------------------------------
गणेशमूर्ती विसर्जनाची ठिकाणे :
समुद्र - ५२
खाडी - १०५
नदी - २४४
तलाव - १००
इतर ठिकाणी - ९४
-----------------------------
ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त
गणेशोत्सवाला गालबोट लागून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलिस उपअधीक्षक सात, पोलिस निरीक्षक २९, सहाय्यक पोलिस निरीक्षक १२८, अंमलदार १,९००, होमगार्ड ५००, एसआरपीएफ एक कंपनी, अधिकारी ३०, पोलिस अंमलदार ३०० असे दोन हजार ८९५ पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.
--------------------------
जिल्ह्यातून २०० एसटी बस
मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी रायगडमधून ज्यादा बसची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून २०० बस रविवार (ता. २३) पासून मंगळवारी (ता.२६) पर्यंत विविध आगारांतून पाठविल्या जाणार आहेत. ठाणे, मुंबईतील चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठीची व्यवस्था केली गेल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली.
---------------------------------
सहा ठिकाणी दुरुस्ती पथके
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, एसटीचा बिघाड झाल्यास तातडीने त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरुस्ती पथके नियुक्त केली आहेत. खारपाडा, पेण, नागोठणे, कोलाड, महाड, कशेडी या भागांत ही पथक नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मेकॅनिक, पर्यवेक्षकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com