गणेशोत्सव आढावा बैठक
गणेशोत्सव आढावा बैठक
जोगेश्वरी, ता. २४ (बातमीदार) ः मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पी दक्षिण आणि पी उत्तर पालिका कार्यालयात खासदार रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव तयारीसाठी आढावा बैठक पार पडली. मुंबई महापालिका विभागीय कार्यालयातील प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक विभाग, अग्निशमन दल, अदाणी इलेक्ट्रिसिटी तसेच विविध सेवाभावी संस्थांनी केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यात आली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त अजय पाटणे, कुंदन वळवी, विभागप्रमुख स्वप्नील टेंबवलकर, वैभव भराडकर, विष्णू सावंत, आत्माराम चाचे, वाहतूक विभागाचे आव्हाड, संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार वायकर यांनी गणरायाच्या मूर्ती वाहतुकीसाठी हातगाड्यांची उपलब्धता करावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, सीसीटीव्ही कॅमेरे, क्रेन, प्रकाश व्यवस्था, पार्किंग यांची योग्य आखणी करावी, विसर्जनावेळी फेरीवाल्यांची गर्दी टाळावी, न्यायालयीन नियमांचे पालन करावे, अशा विविध सूचना करण्यात आल्या. या वेळी नुकतेच राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त दत्ता ढोले यांचा खासदार वायकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.