दोन प्रभागांसह तीन नगरसेवकांमध्ये वाढ

दोन प्रभागांसह तीन नगरसेवकांमध्ये वाढ

Published on

जव्हार, ता. २४ (बातमीदार) : जव्हार नगर परिषदेच्या नगरसेवकांची पंचवार्षिक राजवट संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यानंतर तीन वर्षांचा कार्यकाळ संपला. यादरम्यान काही विकासकामे होण्यात अडथळा निर्माण झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची प्रभागरचना जाहीर झाली आहे. यात पूर्वीच्या १७ नगरसेवकांच्या संख्येत तीनने भर पडली, तर आठ प्रभागांचे यंदा १० प्रभाग होऊन नगरसेवकांची एकूण संख्या २० झाली. नवीन प्रभागरचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागाची बेस लोकसंख्या गृहीत धरली गेली आहे, परंतु गेल्या १५ वर्षांत झालेली लोकसंख्या वाढ लक्षात घेतल्यास प्रत्यक्ष मतदानाची संख्या प्रत्येक प्रभागात चारशे ते सातशे मतांनी जास्त असण्याची शक्यता आहे. प्रभागरचनेत साधारणपणे गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे सीमा धरली गेली आहे. त्यामुळे काही इच्छुक नगरसेवकांना सुटसुटीत मतदारसंघ मिळाला असून, काहींना नव्याने प्रभाग शोधावा लागणार आहे. झोपडपट्टी विरहित मतदारसंघ, तर काहींना नवीन मतदारांची ओळख करून घ्यावी लागणार आहे.

जुन्या, माजी नगरसेवकांना विशेष अडचण नसली, तरी नव्या इच्छुकांकडून हरकती नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. मतदानाच्या आकडेवारीसोबतच मोठे आर्थिक गणित लक्षात घेऊनच लढती ठरणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

राजकीय गणिते गुंतागुंतीची
महायुती-महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते. नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघते, त्यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत. प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्रभागात उमेदवार देताना अडचणी येणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

प्रभागनिहाय आरक्षणाची शक्यता
खुला प्रवर्ग : ६, महिला राखीव : १
एस.सी. : २, महिला राखीव : १
एसटी : ७, महिला राखीव : ४
ओबीसी : ५, महिला राखीव : ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com