बाहेर पाऊस, महाविद्यालयात बरसल्या कविता.....

बाहेर पाऊस, महाविद्यालयात बरसल्या कविता.....

Published on

महाविद्यालयात बरसल्या कविता
मोखाडा श्रावणी संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग
मोखाडा, ता. २४ (बातमीदार) ः मोखाडा महाविद्यालयात पंधरावे कवी संमेलन घेण्यात आले. मोखाड्यात पावसाच्या सरी कोसळत असताना रयत शिक्षण संस्थेच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या सभागृहात कवितांचा पाऊस बरसत होता. ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक कविता सादर केल्याने हे खऱ्या अर्थाने श्रावणी कवी संमेलन ठरल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य चांदोरे यांनी व्यक्त केली.
या कवी संमेलनास ज्येष्ठ कवी राजेंद्र काटीलकर यांनी या भागातील प्रस्तावित डहाणू नाशिक रेल्वेस्थानक याविषयी व्यंगात्मक कविता सादर करत सगळ्यांचीच मने जिंकली. व्यसनाकडे वळालेला बाप आणि आईचा संवाद व्यक्त करताना आदिवासी बोलीभाषेत आया काही सांगू नको हो बाबा माजलाय या शीर्षकाची कविता सादर करत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या, तर तरुण कवी आणि शिक्षक प्रवीण घुले यांनी प्रेम कविता सादर केल्या. कवी ज्ञानेश्वर पालवे यांनी विनयभंग नावाची कविता सादर करून प्रेमातील धोके याविषयी जागरूकता निर्माण केली. गंभीर विषय अगदी विनोदी भाषेत सादर केल्याने याला महत्त्व प्राप्त झाले होते, तर कवी आणि पत्रकार हनीफ शेख यांनी या मुलींना सार कळतं ही कविता सादर करत विनोदी वातावरण तयार केले होते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेंगाळ यांनी श्रावण कविता सादर करून या कवी संमेलनाला यशस्वी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारधी यांनी तर प्रस्तावना मराठी विभागप्रमुख घाटाळ यांनी केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक सालकर, रवींद्र कटीलकर आणि साजदा शेख यांनी छेडछाडीच्या प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शिक्षक गणेश इंगळे, दीक्षा मोहंडकर, पराडके आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com