कल्याणमधून गणेशोत्सवासाठी ७१३ बस

कल्याणमधून गणेशोत्सवासाठी ७१३ बस
Published on

कल्याणमधून गणेशोत्सवासाठी ७१३ बस
पहिल्या टप्प्यातील ४६५ बस रवाना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ७१३ मोफत बसेस सोडण्यात येत आहेत. यापैकी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून रविवारी ४६५ बस रवाना झाल्या असून, खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांना भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले.

गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासीयांसाठी एक आनंद सोहळाच असतो. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात जात असतात. याच पार्श्वभूमीवरी दरवर्षी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी, चिपळूण, लांजा, देवगड यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे ७०० ते ८०० बस कोकणात रवाना होत असतात.

राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेशभक्त जात असतात. या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या माध्यमातून यंदा ७१३ मोफत बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती. यानुसार या सर्व बसगाड्या रविवारी आणि उद्या सोमवारी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत. यासर्व गाडयांना खासदार डॉ. शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना केल्या.

यातील कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर तसेच अंबरनाथ येथील एकूण ४६५ गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाल्या. रविवारी अंबरनाथ शहरातून ११, उल्हासनगर शहरातून चार, कल्याण पूर्वेतून १२०, कल्याण पश्चिमेतून १७, तर डोंबिवली शहर आणि डोंबिवली ग्रामीण येथून ३१० आणि मुंब्रा येथून तीन बस सोडण्यात आल्या. सोमवारी दिवा शहरातून ११७ आणि कळवा येथून १३१ बस सोडण्यात येणार आहेत.

बसगाड्यांचे तपशील :
ठिकाण बस
अंबरनाथ शहर ११
उल्हासनगर शहर ४
कल्याण (पूर्व) १२०
कल्याण (पश्चिम) १७
डोंबिवली शहर व ग्रामीण ३१०
मुंब्रा ३
एकूण ४६५
दिवा ११७
कळवा १३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com