डहाणू - बोईसर मार्गावर रस्त्याची समस्या गंभीर
खड्ड्यात रस्ता गडप
डहाणू-बोईसर रस्त्याची समस्या गंभीर
वाणगाव, ता. २५ (बातमीदार) : डहाणू ते बोईसर रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. यामुळे विद्यार्थी, प्रवासी आणि ज्येष्ठांना या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे, तर वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
डहाणू ते बोईसर मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला हा मार्ग आहे. दाट लोकवस्ती असलेल्या अनेक गावांना, तालुका व जिल्ह्यांची ठिकाणे आणि एमआयडीसी व मुख्य बाजारपेठा यांना एकमेकांशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याला कोणताही दुसरा पर्यायी रस्ता नाही, परंतु सध्या या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जागोजागी रस्ता उखडला आहे.
या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. केवळ तकलादू उपाययोजना न करता आवश्यक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा व पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याकडेला गटारांची व्यवस्था करण्यात यावी. डहाणू-बोईसर रस्त्याची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी तत्काळ नवीन रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबतचे निवेदन बहाड ग्रामस्थांतर्फे आमदार राजेंद्र गावित यांना देण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे.
रस्ता अस्तित्वातच नाही
विशेषतः डहाणू खाडी, बहाड, पाटीलपाडा, भंडारआळी, कॉलेच स्टाप चिंचणी या टप्प्यात मोठे खड्डे पडले आहेत.
रस्ता जवळजवळ अस्तित्वातच नाही, अशी स्थिती आहे. यामुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, नागरिकांसाठी प्रवास जीवघेणा ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.