दिशादर्शक फलक कोसळला

दिशादर्शक फलक कोसळला

Published on

दिशादर्शक फलक कोसळला
कल्याण-शिळ रस्त्यावरील घटना; वाहतूक खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः वाहनांची सदैव रेलचेल असलेल्या कल्याण-शिळ रस्त्यावर रविवारी (ता. २४) रात्री काटई नाक्याजवळील दिशादर्शक फलक कोसळला. यामुळे दोन्ही दिशांकडील वाहतूक काही तास खोळंबली. ही घटना वाहनचालकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कल्याण-शिळ रोड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, महापे तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत दिशेला जाण्यासाठी कल्याण-शिळ रोडचा वापर वाहनचालक करतात. कल्याण-शिळ रोडवर पलावा पुलाच्या अलीकडे कल्याण दिशेला काटई नाका चौकात दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा वापर मुख्यतः राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे बॅनर लावण्यासाठी केला जात होता. वर्षानुवर्षे त्याची देखभाल-दुरुस्ती न केल्याने हा फलक गंजला होता. सतत पडणाऱ्या पावसासोबतच गेल्या काही दिवसांपासून मध्ये मध्ये सोसाट्याचा वारादेखील सुटत असल्याने हा फलक खराब होऊन कोसळला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे.
फलक कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ढासळलेला मलबा हटविण्याचे काम त्वरित सुरू केले. दरम्यान, यामुळे दोन्ही दिशांकडील वाहतूक काही तासांसाठी खोळंबली. परिणामी काटई नाका, निळजे गावातून ही वाहतूक वळविण्यात आली.
...
या फलकांकडे लक्ष देणार का?
काटई नाका येथे बदलापूर पाइपलाइन रोडवर असाच एक दिशादर्शक फलक आहे. शिवाय दुसरा कल्याण दिशेच्या रोडवर गोळवली येथे आहे. या दिशादर्शक फलकांवरदेखील जाहिराती लावल्या जात असल्याने त्याची अवस्था लक्षात येत नाही. आता या दोन्ही दिशादर्शक फलकांकडे तरी प्रशासन लक्ष देते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com