
कल्याण-पनवेल प्रवासाला चार तासांचा खोळंबा
गावी निघालेल्या चाकरमान्यांना १० तासांचा उशीर
कल्याण, ता. २५ : गणेशोत्सवानिमित्त गावी निघालेल्या चाकरमान्यांना यंदा वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. कल्याणहून पनवेलपर्यंतचा अवघा एक ते दीड तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल चार तास लागत असल्याचे समोर आले आहे. परिणामी कोकण व पश्चिम महाराष्ट्राकडे निघालेल्या एसटी व खासगी वाहनांना एकूण प्रवासासाठी ६ ते १० तासांपर्यंतचा उशीर सहन करावा लागत आहे.
कल्याण-शिळ रोडवर सुरू असलेली मेट्रोच्या गर्डरची बसवणी, पावसामुळे निर्माण झालेले खड्डे आणि अपूर्ण रस्त्यांचे काम यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे वाहनांची गर्दी वाढून वाहतूक पूर्णतः विस्कळित होत आहे. रात्रभर मेट्रो कामासाठी मार्ग बंद ठेवण्यात येतो, याचाही परिणाम दिवसा होणाऱ्या वाहतुकीवर होत आहे. कळंबोली सर्कल परिसरातही वाहनांची मोठी गर्दी दिसून येते.
सोमवारी (ता. २५) सकाळी ७ वाजता विठ्ठलवाडीहून वडूजकडे निघालेली एसटी पनवेलला पोहोचण्यासाठी ११ वाजेपर्यंत अडकून पडली. पनवेल ओलांडायला लागलेल्या या चार तासांमुळे इच्छित गावी पोहोचायला आणखी पाच-सहा तासांचा उशीर झाला. प्रवासादरम्यान तहान, भूक आणि थकवा यामुळे प्रवासी हैराण झाले. रेल्वेची गर्दी टाळून एसटीचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीमुळे प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे. असे नारायण दिवाडकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.