कन्नड अभिनेत्याला तीन कोटी जमा करण्याचे आदेश

कन्नड अभिनेत्याला तीन कोटी जमा करण्याचे आदेश

Published on

कन्नड अभिनेत्याला तीन कोटी जमा करण्याचे आदेश
पैसे जमा करून प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचे न्यायालयाचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २५ : कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा ऊर्फ ​​ध्रुव कुमार यांना प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची संधी देताना तीन कोटी रुपये न्यायालयीन महानिबंधकांकडे जमा करण्याचे आदेश सोमवारी (ता. २५) उच्च न्यायालयाने दिले.

चित्रपट निर्माते राघवेंद्र हेगडे यांनी नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप सर्जा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हेगडे यांनी सर्जा यांच्यावर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. कन्नड अभिनेत्याने सहकार्याची विनंती करून हेगडे यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतले. हेगडे यांनी २०२०पासून एफआयआर दाखल होईपर्यंत विविध संस्थांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतल्यामुळे त्यांच्यावर एकूण ४३ कोटी रुपये कर्ज झाले आहे. इतक्या मोठ्या बाबीनंतर सर्जा यांनी चित्रपटातून माघार घेतली आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक केल्याचा आरोप हेगडे यांनी तक्रारीत केला होता. त्यानंतर सर्जा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फौजदारी खटला रद्द करण्यासाठी सर्जा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सोमवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी २०१९मध्ये एका चित्रपटासाठी करार केल्यानंतर हेगडे यांच्याकडून त्यांना तीन कोटी रुपये घेतल्याचे कन्नड अभिनेत्याने मान्य केले; परंतु पुढील तीन वर्षांत चित्रपट पुढे सरकलाच नाही. त्यानंतर अचानक सर्जाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा वरिष्ठ वकील एमएस श्यामसुंदर सेनी यांनी केला.

पहिल्यांदा रक्कम जमा!
युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्जा यांना उच्च न्यायालय महानिबंधकांकडे तीन कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम जमा करून तुम्ही तुमचा प्रामणिकपणा सिद्ध करा, असेही न्यायालयाने सर्जा यांना सुनावले. त्यास सहमती दाखवून कोणत्याही कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी सैनी यांना केली; परंतु पहिल्यांदा रक्कम जमा करा. त्यानंतर तुमच्या विनंतीचा विचार करू, असे स्पष्ट करून न्यायालयाने सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com