घरगुती गणपती देखाव्यांच्या सजावटीसाठी पुरस्काराचे व्यासपीठ
घरगुती गणपती देखाव्यांच्या सजावटीसाठी पुरस्काराचे व्यासपीठ
सकाळ भक्ती-शक्ती व्यासपीठ आणि ‘देवमोगरा’मार्फत स्पर्धेचे आयोजन
पालघर, ता. २५ : अवघ्या काही तासांवर आलेल्या श्रींच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आकर्षक सजावटीच्या वैविध्यपूर्ण देखाव्यांमध्ये बाप्पाला विराजमान करण्यासाठी सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कल्पकता, नावीन्यपूर्णता आणि पर्यावरणपूरक कल्पना वापरून गणेशोत्सवात सजावट करण्याचा प्रत्येकाचा कल असतो. अशा सजावटींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’मार्फत भरघोस बक्षिसांची संधी पालघरवासीयांसाठी चालून आली आहे. पालघर जिल्ह्यात वैविध्यपूर्ण, कलात्मक, सामाजिक एकतेचा संदेश देणारे देखावे अशा सजावटींसाठी ‘सकाळ’मार्फत आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.
घरगुती गणपतीच्या वेगवेगळ्या आरास, सजावटी, पर्यावरणपूरक सजावट, वैविध्यपूर्ण देखावे, टाकाऊपासून टिकाऊ आकर्षक देखणे देखावे, हरित देखावे, आध्यात्मिक, देशप्रेम या विषयावर एकात्मिकतेचा संदेश देण्यासाठी तयार केलेले देखावे अशा कल्पकतेला ‘सकाळ’मार्फत एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. सजावटीचे छायाचित्र पाठवल्यानंतर निवड समितीमार्फत दररोज उत्कृष्ट सजावटीचे प्रथम तीन क्रमांकांचे सजावटीचे फोटो ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. गणेशोत्सवानंतर एका कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह वितरित केले जाणार आहे.
कलात्मकतेला वाव मिळावा, यासाठी ‘सकाळ’मार्फत आयोजित घरगुती देखावे सजावट स्पर्धा गणेशभक्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमातून पर्यावरणपूरकतेचा संदेशही भक्तांना मिळणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असून, कलेला व्यासपीठ व महत्त्व मिळवून देणार आहे.
- राजेंद्र गावित, विश्वस्त, देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशन
कलात्मकता आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करून केलेल्या देखाव्यांना ‘सकाळ’मार्फत एक वेगळी ओळख दिली जात आहे, हा वैशिष्ट्यपूर्ण व चांगला उपक्रम असून, त्या माध्यमातून गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
- रोहित राजेंद्र गावित, विश्वस्त, देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशन
गणेशोत्सवाच्या काळात वैविध्यपूर्ण देखाव्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून ‘सकाळ’ने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे कल्पकतेला आणखीन वाव व चालना मिळणार आहे.
- साईराज कल्पक पाटील, विश्वस्त, देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशन
बौद्धिकता आणि कलात्मकता यांना नेहमीच खतपाणी देणाऱ्या ‘सकाळ’ने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे, तितके कमी आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने उपजत कलागुणांना चांगला वाव व व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
- कल्पक धनेश पाटील, देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.