कोकणातील गणेशोत्सवाचा प्रवास सुकर

कोकणातील गणेशोत्सवाचा प्रवास सुकर
Published on

कोकणातील गणेशोत्सवाचा प्रवास सुकर
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मोफत बससेवा
उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : गणरायाच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या पुढाकारातून मोफत बस सेवा उल्हासनगरातून रवाना करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे गावी जाण्याची ओढ असलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

कोकणवासी दरवर्षी आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहतात; मात्र प्रवासातील अडचणी त्यांच्यासाठी कायमची समस्या राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पुढाकारातून काही वर्षांपासून मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या ७१३ मोफत बसेस सोडण्यात आल्या आहेत.
उल्हासनगरातील मराठा विभागातून रविवारी बस रवाना झाल्या. या बस चिपळूण आणि मालवण या ठिकाणी जाणाऱ्या कोकणवासींसाठी मार्गस्थ करण्यात आल्या. या वेळी माजी महापौर लिलाबाई आशान, सामाजिक कार्यकर्त्या साक्षी सुर्वे आणि संदीप सुर्वे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

अंबरनाथमधून बससेवा सुरू
​अंबरनाथ (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातूनही कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सोमवारी बसगाड्या सोडण्यात आल्या. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस सेवा सुरू केली. या वेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व युवासेना निरीक्षक (कल्याण-भिवंडी लोकसभा) ॲड. निखिल वाळेकर यांनी उपस्थित राहून गणेशभक्तांशी संवाद साधला. त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी उपशहरप्रमुख प्रकाश डावरे, पद्माकर दिघे, युवासेना लोकसभा समन्वयक स्वप्नील जावीर, युवासेना शहराध्यक्ष स्वप्नील भामरे, उपशहराध्यक्ष अजय गारकर, शाखाप्रमुख रवी खांडेकर, विभागाध्यक्ष ललित बागुल, अनिकेत अनिल, हर्षल पाटील, आकाश जगले, युवती सेनेच्या स्नेहल कांबळे, सुषमा पुजारी, महिला आघाडीच्या अरुणा पुजारी, शिवसेनेचे विजय लोंढे, अविनाश लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com