ऐन गणेशोत्‍सवात नवी मुंबई पोलिसांसमोर दुहेरी आव्हान!

ऐन गणेशोत्‍सवात नवी मुंबई पोलिसांसमोर दुहेरी आव्हान!

Published on

ऐन गणेशोत्‍सवात नवी मुंबई पोलिसांसमोर दुहेरी आव्हान!
जरांगेंची मुंबईकडे कूच; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अलर्ट मोडवर
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : गणरायांची प्रतिष्ठापना होत असताना २८ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांसमोर गणेशोत्सव आणि भगवे वादळ, असे दुहेरी आव्हान असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाहतुकीचे नियमन त्याचबरोबर अंतर्गत शांतता या सर्व गोष्टींकरिता पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या प्रवेशद्वारावर नवी मुंबई आणि पनवेल परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना होते. येथील लोकवस्ती ही ५० लाखांहून अधिक आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. हा उत्सव शांतते पार पडावा, या अनुषंगाने १० दिवस खाकी वर्दी दक्ष राहते. त्याचबरोबर याच परिसरातून महामार्ग जात असल्याने लाखो कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त मूळ गावी जातात. त्यांना कोणताही अडथळा व अडचण येऊ नये, या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिस रस्त्यावर आहेत. आता संपूर्ण उत्सवानिमित्त बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानावर येत आहेत. त्यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा लाखोंच्या संख्येने असण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. २७) जरांगे पाटील शिवनेरी या ठिकाणी मुक्‍काम करणार आहेत. गुरुवारी सकाळी तेथून ते चाकण-लोणावळामार्गे पनवेलला येणार आहेत. त्यानंतर वाशी आणि नंतर थेट आझाद मैदान गाठणार आहेत. दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज वास्तव्यास असल्याने मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासमवेत येणाऱ्या बांधवांचे स्वागत केले जाणार आहे. त्यांना पाणी वाटप आणि अल्पोहारसुद्धा दिला जाणार आहे. पनवेल, कामोठे, कळंबोली या ठिकाणी तशा अनुषंगाने नियोजनसुद्धा सुरू झाले आहे. दरम्यान, मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी येथे भगव्या वादळाचे मराठा बांधव स्वागत करणार आहेत. या अनुषंगाने मोठा बंदोबस्त नवी मुंबई पोलिसांना ठेवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com