जलप्रवासात गैरसोईंचे विघ्न
जलप्रवासात गैरसोईंचे विघ्न
बंदरामध्ये सुविधांची वानवा, प्रवासी त्रस्त
उरण, ता. २८ (वार्ताहर)ः देशात जलवाहतूक वाढण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे, परंतु वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस जल प्रवासात विविध समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
उरण मोरा ते मुंबई, भाऊचा धक्का तसेच उरण करंजा ते रेवस यादरम्यान दररोज शेकडोजण जलप्रवास करतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही भर दिलेला नाही. वर्षानुवर्ष एकाच ठेकेदाराकडे प्रवासी लॉन्च ठेका असल्याने जुन्याच प्रवासी बोटी चालवल्या जात आहेत. त्या अनेक वेळा बंद पडण्याच्या घटना ही घडल्या आहेत, मात्र कोणत्याही प्रकारचे अद्यावतपणा आलेला नाही. बोटीमध्ये बसण्यासाठीचे बाकडे तुटलेल्या अवस्थेत असतात. त्याच बोटी दुरुस्त करून वर्षनुवर्षे वापरल्या जात आहेत. अशा बोटीतून प्रवास करणे प्रवाशांच्या जीवावर बेतले जात आहे, तर बोटींच्या वेळांमध्येही सातत्य नसल्याने नोकरदारांची तारांबळ उडत असते. विशेष म्हणजे, याबाबतच्या तक्रारी अनेक वेळा लेखी स्वरूपात लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत, मात्र त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासीसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
--------------------------------------
स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी
करंजा-रेवस तर प्रवाशांच्या सोयीसाठी बंदरावर शौचालय आणि स्वच्छतागृह उभारण्यात आले होते, मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, शौचालय बंद पडले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होते. मोरा बंदरातदेखील अशीच अवस्था आहे. येथे वाहनांसाठी पार्किंग असल्यामुळे जाणे कठीण होते. तसेच पाणी नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.
-----------------------------------------
निवारा शेडचा अभाव
करंजा-रेवस तर सेवच्या प्रवाशांसाठी जेट्टी परिसरात निवारा शेड नसल्याने उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावरच बोटीची वाट पाहात ताटकळत राहावे लागते. त्यामुळे विशेषकरून वृद्ध, महिला, लहान मुले आणि गर्भवती महिलांचे मोठे हाल होतात. तसेच बोटी जाण्याऱ्या मार्गात जाळे असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
-------------------------------------
गाळाची समस्या कायम
मोरा परिसरातील गाळ काढण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले, मात्र समस्या आजही कायम आहेत. ठेकेदारकडून गाळ काढल्यानंतर तो जवळच टाकल्याने तीच परिस्थिती उद्भवत आहे. प्रवासी बोटी गाळात रुतत असल्याने या मार्गांवर अद्यावत बोटीची मागणी होत आहे.
-------------------------------
मोरा मार्गांवरून मुंबईकडे प्रवास करीत आहे. २५ वर्षांनंतरही प्रवासामध्ये कोणताही अद्ययावतपणा आलेला नाही. त्याच बोटी दुरुस्त करून चालवल्या जात आहेत. प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
- दत्ता पुरो, प्रवासी, उरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.