गणोबा मंदिरात भक्तीचा जागर

गणोबा मंदिरात भक्तीचा जागर

Published on

गणोबा मंदिरात भक्तीचा जागर
श्रमदानातून मंदिराचा जीर्णोद्धार, भाविकांमध्ये श्रद्धास्थान
तुर्भे, ता. २८ (वार्ताहर) : तुर्भे गावचे ग्रामदैवत मानले जाणारे गणोबा मंदिर भक्तिभावाने उजळून निघाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या लोकवर्गणी व श्रमदानातून झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराचे रूपडे अधिकच आकर्षक झाले असून, भाविकांची मांदियाळी येथे पाहायला मिळते. या देवस्थानामुळे तुर्भे तसेच साष्टी परिसरातील श्रद्धाळूंमध्ये भावनिक नाळ जुळलेली आहे.
१९५२ मध्ये कर्मयोगी डॉ. सिताराम विश्वनाथ सामंत (दादा सामंत) यांनी तुर्भे गावात विभागातील पहिली माध्यमिक शाळा सुरू केली. त्याच काळात ग्रामस्थांच्या सहभागातून गणोबा मंदिराचा पहिला जीर्णोद्धारही झाला. कालांतराने पुन्हा नव्याने मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, भव्य सभा मंडप, नयनरम्य विहीर, आकर्षक मूषकराज आणि स्वयंभू गणोबाची मूर्ती भाविकांचे मन वेधून घेते. एमआयडीसी क्षेत्रात, जयसिंथ डायकेम कंपनीलगत हे मंदिर आहे. पूर्वी परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. गुराखी, शेतकरी किंवा वाटसरू रस्ता चुकल्यास गणोबाचा धावा करीत असे आणि गणोबा वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊन त्यांचे रक्षण करत असे, असा समृद्ध लोकविश्वास आजही भाविकांमध्ये प्रचलित आहे.
--------------------------------------------
आगळीवेगळी परंपरा
गणोबाचे वाहन घोडा असल्याने तुर्भेतील ग्रामस्थ गावात कुठल्याही समारंभात घोड्यावर बसत नाहीत किंवा मिरवणुकीत घोड्याचा वापर करत नाहीत. आपल्या देवाचे वाहन स्वतःसाठी कसे वापरावे? या आदरभावनेतून जन्माला आलेली ही परंपरा आजही गावकऱ्यांनी जपली आहे.
---------------------------
ब्रिटिशकालीन महत्त्व
गणोबा मंदिर संपूर्ण नवी मुंबईवासीयांचे श्रद्धास्थान आहे. १८६४ पूर्वीच्या काळात उभारलेली मंदिरे ऐतिहासिक वारशाचे द्योतक मानली जातात. तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबई प्रांतातील निवडक मंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सनद दिली होती. राणी व्हिक्टोरियाच्या आदेशानुसार मुंबई राज्याचे गव्हर्नर सर हेनरी हर्टल एडवर्ड फ्रियर आणि सर रॉबर्ट सीमर व्हर्सो फित्र गेराल्ड यांच्या सहीने मंदिरांना मिळालेल्या सनदा उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com