गावोगावी भक्तीचा गजर
गावोगावी भक्तीचा गजर
५८६ ठिकाणी बाप्पा विराजमान
जव्हार, ता. २८ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मंगलमय वातावरणामुळे भक्तांच्या आनंदाला उधाण आले आहे. यंदाच्या वर्षात जव्हार तालुक्यात ५८६ ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यापैकी ११८ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव तर १३ गावांत ‘एक गाव एक गणपती’ आणि ४४५ ठिकाणी वैयक्तिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महानगरांचा प्रभाव असलेल्या या भागात उत्सव नेहमीच एकोप्याने साजरे होतात. यंदा नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय पक्षांचाही मोठा सहभाग या उत्सवात दिसून येत आहे.
तालुक्यात एकूण ५८६ ठिकाणी गणराय विराजमान झाले आहेत. यामध्ये ११८ सार्वजनिक मंडळे, १३ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’, तर ४५५ ठिकाणी वैयक्तिकरीत्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकाभिमुख सण मानला जातो. जव्हारसारख्या आदिवासीबहुल आणि विविधतेने नटलेल्या तालुक्यात सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. काही गावांमध्ये दीड दिवस, काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी ११ दिवस गणराय विराजमान असतो. या काळात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, नृत्य-नाट्य तसेच पारंपरिक लोककला सादर केल्या जातात. तालुक्यात एकूण ११६ महसूल गावे असून, जवळपास प्रत्येक गावात किमान एक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
‘एक गाव एक गणपती’ संकल्पना
पूर्वी अनेक गावांमध्ये दोन-तीन मंडळांत स्पर्धा, मतभेद, वाद आणि गोंधळ दिसून येत असे. त्यामुळे ग्रामविकास, सुरळीत वर्गणी वसुली आणि शांतता राखण्यात अडचणी यायच्या. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सुरू केली. यंदा तालुक्यात १३ गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन एकाच मंडळामार्फत गणपती साजरा करीत आहेत.
जव्हार शहर अथवा ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांततेच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना डीजे वाजवण्यापेक्षा गावातील पारंपरिक वाद्यांचा आनंद घ्यावा. तसेच गुलालाऐवजी सुगंधित फुलांची, पाकळ्यांची उधळण करावी. बाप्पाच्या उत्सवात मद्यप्राशन अजिबात करू नये.
- विजय मुतडक, पोलिस निरीक्षक, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.