सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने राबविला अनोखा उपक्रम
सार्वजनिक शिवजयंती मंडळाचा अनोखा उपक्रम
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : वालधुनीमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील विभागात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेवाळ जमा झाले होते. यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. चाकरमानी, वृद्ध आणि विद्यार्थीवर्गाची पाय घसरून पडण्याची भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून विभागात ब्लिचिंग पावडरची फवारणी केली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वालधुनी परिसरातील समाधान अपार्टमेंट, किसन शेट्टी चाळ, तांबे चाळ, सुंदराबाई चाळ, राणे निवास, अनुराग अपार्टमेंट, सनराईज अपार्टमेंट, दत्त मंदिर परिसर, कमानी निवास, मुकुटराव चाळ, संते निवास, लक्ष्मी अपार्टमेंट, गांगुर्डे निवास, घोलप चाळ, मातोश्री चाळ, जाधव चाळ, एखंडे बिल्डींग, निकम निवास, शकुंतला निवास, लक्ष्मण पावशे चाळ, झिपाबाई चाळ, लाकडे निवास, आशा पॅलेस, सिताराम पावशे चाळ, स्मिता निवास, कमळू पावशे चाळ, काठोळे चाळ, पडवळ चाळ, राधाकृष्ण बिल्डिंग, सातारकर चाळ, जेपी तिवारी चाळ, यादव चाळ आदी ठिकाणी ब्लिचिंग पावडर फवारणी केली आहे. या उपक्रमाबद्दल विभागातील सर्व नागरिकांकडून शिवभक्तांवर कौतुकाची थाप पडत आहे.