संकटात धावून येणारा खरा देवदूत संकटमोचक  धनंजय गीध !!

संकटात धावून येणारा खरा देवदूत संकटमोचक धनंजय गीध !!

Published on

अपघातग्रस्तांसाठी मोहपाड्यातील संकटमोचक
महामार्गांवरील रसायन गळती रोखण्यात धनंजय गीध यांना यश
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २८ ः अपघातग्रस्त टँकरमधून गॅस, रसायन गळतीच्या प्रकारांमुळे मोठी दर्घटनेची शक्यता असते. अशा संकटात मोहपाडातील धनंजय गीध यांनी गॅसगळती थांबवून शेकडो नागरिकांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळेच राज्यासह परराज्यात संकटमोचक, अशी ओळख झाली आहे.
वेगवेगळ्या उद्योगांना कच्च्या मालासाठी लागणाऱ्या गॅस, रसायनांची दक्षिणेकडील राज्यांकडे महामार्गांवरून वाहतूक केली जाते. पनवेल परिसरातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अशी वाहने सतत धावतात. अशावेळी एखादा अपघात झालाच तर वायुगळतीमुळे आग किंवा स्फोटांचीही शक्यता असते. त्यामुळे अशी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागते. अशा आपत्कालीन स्थितीत कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी मोहपाडा येथील रहिवासी असलेले धनंजय गीध नेहमी धावून येतात. गॅस कंपनीतील कामाच्या अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गळती परिस्थिती बंद केली आहे. विशेष म्हणजे, गीध ही सेना विनामोबदला सेवा करत असल्याने शासकीय यंत्रणांबरोबर विविध सामाजिक संस्थांनीही त्यांचा सन्मान केला आहे.
-------------------------------
राज्यासह परराज्यात मोहिमा
़ः- लांज्याला पाण्यात पडलेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या गाडीत भरताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच धुळे, सातारा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी अशा आपत्तीतून बाहेर काढले आहे. त्याचबरोबर कोईमतूर येथेही कोणताही अनर्थ घडू दिला नाही.
- कोचीन येथून गुजरात येथे प्रोपोलीन अतिज्वलनशील गॅस घेऊन निघालेल्य टँकरला तमिळनाडूमधील विजयमंगल टोलनाक्याजवळ गळती लागली होती. त्यांच्यासाठी रस्तामार्गे विमानतळापर्यंत व पुन्हा घटनास्थळापर्यंत सोमवारी खास ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता.
---------------------------------
अपघातग्रस्तांसाठीचा देवदूत
धनंजय गीध यांनी आणि त्यांचे सहकारी गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, हनिफ करजीकर यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीकरिता सामाजिक संस्था सुरू केली आहे. या माध्यमातून महामार्ग, कारखाने आणि सोसायट्यांमध्ये झालेले अपघात, आगीच्या घटनांसाठी मदतीकरिता धावून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com