थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

माणगावातील वाहतूक कोंडीवर यंदा दिलासा
माणगाव (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावची वाहतूक कोंडी ही वर्षभर त्रासदायक ठरते. गणेशोत्सव काळात ही समस्या अनेक पट वाढते. मात्र यावर्षी पोलिस प्रशासनाच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सेवा फाउंडेशनच्या तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने ही समस्या कमी केली. त्यामुळे गणेशभक्तांनी माणगाव सहज पार करत समाधान व्यक्त केले. मुंबई-गोवा महामार्गासोबत दिघी-पुणे महामार्ग आणि इतर राज्य मार्गांचा संगम माणगाव येथे होतो. रखडलेल्या कामांमुळे महामार्गाची अवस्था दयनीय असून प्रवाशांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागतो. मात्र यावर्षी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस आणि सेवा फाउंडेशनने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
....................
‘इंदापूर-दाखणे-माणगाव’ पर्यायी मार्गाची मागणी
माणगाव (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या बायपास कामामुळे माणगाव परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने काही पर्यायी मार्ग प्रस्तावित केले असले तरी इंदापूर-दाखणे-माणगाव कालवा मार्गाचा समावेश झालेला नाही. या मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाले तर माणगावातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा मिळेल, असे वाहनचालकांचे मत आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी या मार्गाचा समावेश करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग सर्वात सोयीचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
.................
इंदापुरात गणेश भक्तांना नाश्ता व पाणी
माणगाव (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ मुंबई-गोवा महामार्गावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे भाजप नेते संजय आप्पा ढवळे यांनी भक्तांसाठी सेवा उपक्रम राबवला. सुविधा केंद्रासमोर सुमारे दोन हजार गणेशभक्तांना पुरी-भाजीचा नाश्ता व बिसलरी पाण्याच्या बाटल्या देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमात पोलिस कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रवाशांना दिलासा देणारा हा उपक्रम भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. भक्तांनी आणि पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या सदिच्छा उपक्रमामुळे भक्त आणि पोलिस दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. हा उपक्रम भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व खासदार तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष धर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
................
पोयनाड बाजारपेठेत चॉकलेट मोदकाची क्रेझ
पोयनाड (बातमीदार) : गणेशोत्सवात आपल्या लाडक्या गणरायाला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक. हा मोदक आता कालानुरूप बदलत गेला असून काजू मोदक, मावा मोदक, खवा मोदक, ड्रायफूट मोदक या लोकप्रिय मोदकांच्या उत्पादनासोबतच आता अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत चॉकलेट मोदकाची क्रेझ दिसून येत आहे. पोयनाड बाजारपेठेत सध्या या चॉकलेट मोदकांना मोठी मागणी दिसून येत आहे. बदलत्या कालानुरूप या मोदकांच्या चवीमध्ये बदल होत गेला असून या वर्षी बाजारपेठेत मिठाई व्यापाऱ्यांनी चॉकलेट मोदक विक्रीसाठी ठेवले आहेत. खवा आणि चॉकलेटचे एकत्रित मिश्रण करून या मोदकांची निर्मिती केली जाते. या चॉकलेट मोदकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे मिठाई व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. ८०० रूपये प्रति किलो या दराने हे मोदक विक्री करण्यात येतात. यासोबतच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गुलाबजामून, पेढे, वेफर्स, चिवडा, फरसाण, बाकरवडी, पापडी या अन्य पदार्थांना देखील मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
...............
कोमसाप जिल्हाध्यक्षपदी संजय गुंजाळ यांची निवड
रोहा (बातमीदार) ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मुरूड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक संजय गुंजाळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड करण्यात आली. रोहा येथे कोमसाप जिल्हा कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. या सभेत कोमसापची नवीन जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या सभेत रोहा शाखा अध्यक्षा संध्या दिवकर, माजी अध्यक्ष सुधीर शेठ, निवड निर्णय अधिकारी अरुण मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव विजय दिवकर यांची रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी गंगाधर साळवी, गणेश कोळी, मच्छिंद्र म्हात्रे, संजय होळकर, रामजी कदम, सिद्धेश लखमदे, लवेंद्र मोकल, एस. एस. पाटील, सीमा रिसबुड, प्रविता माने, रायाप्पा मशाळे आदी मान्यवर उपस्थित होते. ही सभा यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा संध्या दिवकर, विजय दिवकर, युवा प्रतिनिधी शरद कदम,अजित पाशिलकर, नेहल प्रधान, राजा काफरे, निकीता बोथरे, मारूती कदम, वैशाली साळुंके, राकेश कागडा, सचीन साळुंके यांनी परिश्रम घेतले.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com