सण-उत्‍सावात चोरीच्या घटनेत वाढ

सण-उत्‍सावात चोरीच्या घटनेत वाढ

Published on

सण-उत्‍सावात चोरीच्या घटनांत वाढ
तीन दिवसांत पाच महिलांचे लाखोंचे दागिने लुटले; पोलिसांकडून शोधमोहीम
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : नवी मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चेन स्नॅचिंग करणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. मागील तीन दिवसांत एका पुरुषासह पाच महिलांवर हल्ला करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असला तरी चोऱ्या वाढत असल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
२५ ऑगस्ट रोजी सीबीडी सेक्टर-४मध्ये राहणारा नितिकेश शिंदे (वय ३५) सकाळी मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना वारकरी भवनजवळ पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्याच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून नेली. याप्रकरणी नितिकेश शिंदे याने सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याच दिवशी खारघर सेक्टर-३२मध्ये राहणाऱ्या वंदना दगडू साळुंखे (वय ४६) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सेक्टर-३५ येथील हाईड पार्क सोसायटीजवळ पायी चालत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने १५ ग्रॅम वजनाची ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचली. त्यांनीदेखील खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तसेच २६ ऑगस्ट रोजी नेरूळ सेक्टर-६मध्ये राहणाऱ्या सपना तुलसीयान (वय ५०) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अन्नपूर्णा हॉटेलजवळील रस्त्यावरून जात असताना स्कूटीवरून आलेल्या दोघांनी ४० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची चेन खेचून नेली. नेरूळ पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवली आहे. याप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी खारघर सेक्टर-१२मध्ये राहणाऱ्या मीना गायकवाड (वय ५७) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नवरंग चौकात पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका लुटारूने ७२ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ खेचली. त्याच दिवशी घणसोलीत राहणाऱ्या लतिका संतोष पाटील (वय ४७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नातेवाइकाच्या घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने दोन लाख ७० हजार रुपये किमतीची चेन व गंठण खेचून नेले. अशा प्रकारे एकामागोमाग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नवी मुंबईत दहशतीचे वातावरण आहे.
.................
सर्तक राहण्याचे आवाहन
या चेन स्नॅचिंग प्रकरणामुळे नवी मुंबई पोलिस विभागाने शोधकार्य तीव्र केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी चालताना सोन्याचे दागिने न घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांचा शोध सुरू असून, नागरिकांची मदत घेऊन चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com