कक्कया समाजाच्या गणेशोत्सवाचे ८२ वे वर्ष
कक्कय्या समाजाच्या गणेशोत्सवाचे ८२ वे वर्ष
धारावीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी ः स्वातंत्र्यापूर्वी धारावीत कक्कय्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. संपूर्ण कक्कय्या-ढोर समाज या गणपतीचा मान ठेवून गणेशोत्सव साजरा करतात. धारावीमधील शिवपंच मंदिर हे कक्कय्या समजाचे मंदिर होते. इथेच कक्कय्या समाज मंडळाची स्थापना करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान राखत या गणेशोत्सव मंडळाकडून एक शाळा चालवली जाते.
कक्कय्या-ढोर समाजाच्या सात फळी धारावीमध्ये होत्या. सात फळी म्हणजे सात जिल्ह्याचे लोक या धारावीत प्रामुख्याने राहत होते. त्यांच्या सात तालमी होत्या. कुस्त्या, ढाल पट्टा इत्यादी खेळ त्या तालमीत चालत होत्या. कोळी समाजानंतर कक्कय्या- ढोर हा धारावीमध्ये आलेला सर्वात मोठा समाज म्हणून ओळखला जातो. समाजाला एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे व्यासपीठ असावे, समाजाचा गणपती असावा, सर्वजण एकत्र यावेत यासाठी ‘कक्कय्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्थापन करण्यात आले, असे यशवंत नारायणकर यांनी सांगितले.
गणेश विसर्जनाला जाताना धारावीतील कोळी समाजातील महिला आणि कोळी समाज या गणपतीला आजही कंटीमाळेचा मान देतात. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. समाजातील शिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन धारावीत शाळा काढण्यासाठी फार कष्ट घेतले होते. पंच मंदिरात चौथी आणि पाचवीचे दोन वर्ग चालू केले गेले. कक्कय्या समाज मंडळाचे नामांतर ‘संत कक्कय्या विकास संस्था’ असे करून १९७० मध्ये शाळा स्थापन केली गेली. संस्थेचे पहिले अध्यक्ष ॲड. सखाराम शेरखाने, सचिव- नारायण दादू नारायणकर होते.
अनेकांच्या सहकार्याने शाळा सुरू करण्यास मदत झाली. सहसचिव कै. विष्णू बाबाजी गायकवाड, स्थानिक कार्यकर्ते भगवान बोराडे, कै. पिराजी नारायणे, कै. विनेकरी बुवा, कै. नारायण गेणु कदम, कै. अर्जुन बाबाजी गायकवाड, दिगंबर विश्वनाथ शिंदे, कै. दत्तू राहु खंदारे, कृष्णा शिंदे. कै. तमन्ना जोगदंडे आणि युवक मंडळींमध्ये शिवलिंग शिंदे, मधुसूदन कळंबे इतर कार्यकर्ते यांनी जिद्दीने शाळा चालवली.
श्री गणेशाच्या आगमनानंतरच शाळेचा विकास झाला आणि शाळेची इमारत उभी राहिली. कक्कय्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, १९४३ पासून आजतागायत श्री गणेश उत्सव आणि शाळा सुरू आहे.
- हेमंत व्हटकर, अध्यक्ष, कक्कय्या समाज मंडळ
गणेशोत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. बाहेरील संस्थांची मदत घेऊन मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर आदी उपक्रम राबवले जातात.
- मसाजी होटकर, सचिव, कक्कय्या समाज मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.