गणपती उत्सवात राजकीय बैठका

गणपती उत्सवात राजकीय बैठका

Published on

गणेशोत्सवात मतांचा जोगवा
दर्शनाच्या निमित्ताने नेतेमंडळी मतदारांच्या घरी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : गणेशोत्सवानिमित्त खेडोपाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि २४० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीइतकीच चुरस या निवडणुकांत असल्याने गावाकडे आलेल्या कोकणवासीयांच्या मतपरिवर्तनासाठी स्थानिक नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्या, १० नगरपालिका, एका महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. आठ महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींंपैकी २४० ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशातच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून किमान तीन हजार लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत. साधारण १० हजारांहून अधिक स्थानिक नेते निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी राहणारी मंडळी गावाकडे आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठीतून नेतेमंडळी आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करीत आहे.
---------------------------
कोकणवासीयांसाठी मोफत बससेवा
गणशोत्सवासाठी मुंबईतून येण्यासाठी वेळेत बस नसल्याने येथील राजकीय नेतेमंडळींनी मोफत बससेवा सुरू केली होती. या सेवेचा लाभ जिल्ह्यातील पोलादपूर, महाड तालुक्यांबरोबरच रोहा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांतील लोकांनी घेतला. अचानक गावाकडे येण्याचा निर्णय घेतला त्यांना ही सेवा उपयोगी पडली. मोफत बससेवा देण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाची नेतेमंडळी आघाडीवर आहे.
-----------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कोकणात गौरी-गणपती उत्सवानिमित्त जाखडी नृत्य, शक्ती-तुरा, महिलांचे पारंपरिक नृत्यांचे कार्यक्रम गावोगावी सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या आयोजनात नेतेमंडळीही पुढाकार घेऊन साजरे करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अशा कार्यक्रमांचे प्रमाण वाढले असून, स्थानिक नेत्यांनाही प्रसिद्धी करण्याची चांगली संधी मिळत आहे.
--------------------------
गावबैठकांवर जोर
गणपती दर्शनाचे निमित्त करून राजकीय नेतेमंडळी गावाकडे आलेल्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कोकणातील अनेक गावांतील विकासाचे निर्णय मुंबईत नोकरी, धंद्यानिमित्त आलेले चाकरमानी घेत असतात. ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ आणि राजकीय पक्षांचे नेते एकत्र येत गावच्या विकासावर चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावाकडे आलेल्या चाकरमान्यांच्या भेटीला नेतेमंडळी येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com